– ११ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त
मौदा :- मौदा पोलीस अवैध धंदयांवर कारवाई कामी पेट्रोलींग करीत असतांना पोलीसांना गुप्त बातमीदारांकडुन खात्रीशीर माहीती मिळाली की, काही इसम मौजा किरणापुर शिवार चे कन्हान नदीच्या पात्रातुन ट्रॅक्टर लोडर च्या सहायाने ट्रॅक्टर मध्ये रेती भरून अवैधरित्या उत्खनन करून रेतीची चोरटी वाहतूक करत आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे तात्काळ घटनास्थळ गाठले असता मौजा किरणापुर येथिल कन्हान नदी चे पात्रात गेलो असता कन्हान नदी चे पात्रामध्ये एक महीन्द्रा कंपनीचा लोडर ट्रॅक्टर नंबर एम एच ४०-टीसी ०५७ चे सहाय्याने स्वराज ट्रक्टर क्रं एम एच ४० सी एक्स ८७१३ चे मागे लावलेली बिना नंबरची निळ्या रंगाची ट्रॉली मध्ये रेती भरतांना दोन इसम (लोडर ट्रॅक्टर आणि ट्रक्टर चालक) मिळुन आले. पंचासमक्ष त्याचे नाव पत्ता विचारले असता आरोपी क्र १) लोडर ट्रॅक्टर नंबर एम एच ४० टीसी ०५७ चा चालक आरोपी प्रेम दिवाकर सावरकर, वय २७ वर्ष, रा. वार्ड नं ०३ बाबदेव ता मौदा जि नागपुर याला विचारपुस केली असता त्याने आरोपी क्र २) गुड्डु पटले, रा. बाबदेव, ता मौदा जि. नागपुर याचे सांगणेवरून रेतीची चोरटी वाहतुक करण्यासाठी रेती उत्खनन केल्याची माहीती दिली तसेच आरोपी क्र ३) ट्रक्टर क्रं एम एच ४० सी एक्स ८७१३ चा चालक आरोपी कौशिक उर्फ हर्षल सहादेव बुचके वय २० वर्ष, रा. चेहडी, ता. मौदा, जि. नागपुर याला विचारपुस केली असता त्याने आरोपी क्रं ४) ट्रक्टर मालक नामे खुशाल वामण ठाकरे वय ३८ वर्ष रा नानादेवी ता मौदा जि नागपुर याचे सांगणेवरून उत्खनन केले. दोन्ही आरोपींना परवान्याबाबत विचारना केली असता त्यांच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे त्यांनी सांगितले.






