Home Latest News भंडारा: भरदिवसा घरफोडी; एसटी कंडक्टरच्या घरातून १.६१ लाखांचे दागिने व रोकड लंपास

भंडारा: भरदिवसा घरफोडी; एसटी कंडक्टरच्या घरातून १.६१ लाखांचे दागिने व रोकड लंपास

0

<p><strong>हंसराज&comma; प्रतिनिधी भंडारा &colon;-<&sol;strong> शहरातील न्यू बौद्ध वार्ड&comma; बेला परिसरात १ जानेवारी रोजी दुपारी भरदिवसा चोरीची एक धाडसी घटना घडली आहे&period; एका एसटी कंडक्टरच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख ६१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला&period;<&sol;p>&NewLine;<p>मिळालेल्या माहितीनुसार&comma; फिर्यादी सतीश काशीनाथ शेंडे &lpar;वय ४८&rpar;&comma; व्यवसाय एसटी कंडक्टर&comma; रा&period; न्यू बौद्ध वार्ड&comma; बेला हे आपल्या पत्नीसह १ जानेवारी रोजी दुपारी १&colon;०० ते ४&colon;०० च्या दरम्यान घराला कुलूप लावून ऑफिसच्या कामासाठी भंडारा येथे गेले होते&period; घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला&period;<&sol;p>&NewLine;<p>दुपारी ४&colon;०० वाजेच्या सुमारास त्यांच्या शेजारी राहणाऱ्या वर्षा राऊत यांनी शेंडे यांना फोन करून घराची कडी उघडी असून घरातील सामान अस्ताव्यस्त पडल्याची माहिती दिली&period; शेंडे दाम्पत्याने तातडीने घरी येऊन पाहिले असता&comma; बेडरुममधील लोखंडी आलमारीचे लॉकर तुटलेले दिसले&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>चोरीला गेलेला माल<&sol;strong>&colon;<&sol;p>&NewLine;<p>चोरट्यांनी आलमारीतून १० ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र &lpar;किंमत ५०&comma;००० रु&period;&rpar;&comma; ५ ग्रॅमच्या ३ सोन्याच्या अंगठ्या &lpar;किंमत ७५&comma;००० रु&period;&rpar;&comma; ५ ग्रॅमचे सोन्याचे कानातील टॉप्स &lpar;किंमत २५&comma;००० रु&period;&rpar;&comma; १० ग्रॅमचा चांदीचा कडा &lpar;किंमत २&comma;००० रु&period;&rpar; आणि ९&comma;५०० रुपयांची रोख रक्कम असा एकूण १&comma;६१&comma;५०० रुपयांचा ऐवज लंपास केला&period;<&sol;p>&NewLine;<p>सतीश शेंडे यांच्या तक्रारीवरून भंडारा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३३१&lpar;३&rpar; अन्वये गुन्हा &lpar;अप&period; क्र&period; १९&sol;२०२६&rpar; नोंद करण्यात आला आहे&period; या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घनश्याम नवखरे करीत आहेत&period; भरदिवसा झालेल्या या चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून&comma; पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version