Home Latest News ग्रामपंचायत नगरधनला आंतरराष्ट्रीय मानांकन

ग्रामपंचायत नगरधनला आंतरराष्ट्रीय मानांकन

0

<p><strong>&&num;8211&semi; मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचे औचित्य<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>सचिन चौरसिया&comma; प्रतिनिधी à¤°à¤¾à¤®à¤Ÿà¥‡à¤• &colon;-<&sol;strong> मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायत नगरधन ने गुणवत्तापूर्ण प्रशासनाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत आयएसओ 9001&colon;2015 हे आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त केले आहे&period; हे प्रमाणपत्र ग्लोबल सर्टिफिकेशन या मान्यताप्राप्त प्रमाणन संस्थेमार्फत प्रदान करण्यात आले आहे&period; ग्रामपंचायतीच्या नियोजनबद्ध&comma; पारदर्शक व नागरिकाभिमुख कार्यपद्धतीची सखोल तपासणी व मूल्यांकन करून हे मानांकन देण्यात आले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>सामान्य प्रशासन&comma; आरोग्य सेवा&comma; शिक्षण व प्रशिक्षण&comma; पशुसंवर्धन&comma; पाणीपुरवठा&comma; बांधकाम &lpar;वर्क्स&rpar;&comma; लघु सिंचन&comma; वित्त व लेखा&comma; सामाजिक कल्याण&comma; कृषी तसेच महिला व बालकल्याण या विविध सेवा क्षेत्रांतील गुणवत्तापूर्ण कामकाजासाठी ग्रामपंचायत नगरधनची निवड करण्यात आली आहे&period; ISO 9001&colon;2015 प्रमाणपत्रामुळे ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामकाजात शिस्त&comma; पारदर्शकता&comma; वेळेवर सेवा&comma; तक्रार निवारण व नागरिक समाधान यांना अधिक बळ मिळणार आहे&period; तसेच शासनाच्या विविध योजना अधिक प्रभावीपणे राबवून गावाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे&period; हे यश सरपंच माया दमाहे&comma; उपसरपंच श्रीराम धोपटे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत सदस्य सचिन दशहरे&comma; जितेंद्र सरोदे&comma; विलास कुंभले&comma; मोहित इखार&comma; वासुदेव चवरे&comma; माधुरी बोरकर&comma; सुरेखा नागरिकर&comma; शारदा सरोदे&comma; संगीता तरारे&comma; शारदा ठाकरे&comma; रोशनी सरोदे&comma; संगीता नान्हे&comma; तसेच ग्रामपंचायत अधिकारी कृष्णा बानाबाकोडे व सर्व कर्मचारी यांच्या संघटित प्रयत्नांचे फलित आहे&period; या यशाबद्दल ग्रामपंचायत नगरधन भविष्यातही गुणवत्ता&comma; पारदर्शकता व विकासाभिमुख प्रशासनाची परंपरा कायम ठेवणार असल्याचा विश्वास ग्रामपंचायत कमेटीने व्यक्त केला आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version