spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

गोकुळ अध्यक्ष निवडीत मोठा ट्विस्ट, अखेरच्या क्षणी सतेज पाटील यांनी डाव टाकला, पण…

गोकुळ अध्यक्ष निवडीत मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. एकीकडे गोकुळच्य अध्यक्ष निवडीसाठी 4 शासन नियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार बहाल केला आहे. कोर्टाच्या निर्णयाने महायुतीचा आत्मविश्वास बळावल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता होणार्‍या निवडणुकीत चारही संचालक हे मतदान करणार आहेत. परंतु या संचालकांच्या मतदानाच्या अधिकारावर सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीने आक्षेप घेतला आहे. समविचारी आघाडीच्या आक्षेपामुळे महायुतीचं टेन्शन वाढल्याची चर्चा सुरू झाली आहे. समविचारी आघाडीच्या आक्षेपामुळे आता निवडणूक होणार का, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

कोल्हापुरातील गोकुळच्या अध्यक्ष निवडीआधी घडामोडींना वेग आला आहे. गोकुळचा अध्यक्ष कोण होणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. या निवडीसाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महायुतीकडून अध्यक्षपदासाठी राजेश पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तर सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीने शशिकांत पाटील-चुयेकर यांनी उमेदवारीचा अर्ज भरला आहे. एकीकडे महायुतीच्या हसन मुश्रीफ यांनी गोकुळचा अध्यक्ष महायुतीचाच होणार असल्याचा दावा केला आहे. महायुतीने गोकुळच्या अध्यक्ष निवडीच्या दिवशी सभेचं आयोजन केलं आहे. महायुतीने अध्यक्षपदासाठी जोरदार फिल्डिंग लावल्याचे दिसत आहे. तर सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीने शेवटच्या क्षणी डाव टाकल्याचे समोर आलं आहे.

– Credit by TV 9Marathi

Popular Articles