spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कांद्रीच्या सुखदेव कॉलनीत घरफोडी

– चांदी-सोन्यासह ९८ हजारांचा दागिने चोरी

कन्हान :- कांद्री येथील सुखदेव कॉलनी परिसरातील बंद घराचे कूलुप तोडुन अज्ञात चोरट्याने सुमारे ९८ हजार रुपयाचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघड कीस आली आहे. या घटनेत मोठ्या प्रमाणात चांदीचे दागिने व चांदीच्या वस्तुंसह १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे बिस्कीट चोरीला गेले आहे.

प्राप्त माहितीनुसार फिर्यादी लता गणेश नगरकर वय ५२ वर्ष, रा. सुखदेव कॉलोनी कांद्री-कन्हान या सध्या आपल्या मुलासोबत मध्य प्रदेशातील सिंगरौली जिल्ह्यातील वैढण येथे राहत असुन अधुनमधुन कांद्री येथील घरी येत असतात. त्यांच्या कांद्री येथील घराची देखरेख अरविंद गोकुल प्रसाद वय ३१ वर्ष, रा. कोळसा खदान क्र. ३ हे करीत असल्याचे तक्रारीत नमुद आहे. बुधवार (दि.५) ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजता फिर्यादी घरातुन बाहेर गेल्या होत्या. त्यानंतर शुक्रवार (दि.७) ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ९ वाजता घराची देखरेख करणाऱ्या व्यक्तीने त्यांच्या मुलाला फोन करून घरात चोरी झाल्याची माहिती दिली. या नंतर शनिवार (दि.८) ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे १० वाजता फिर्यादी कांद्री येथील घरी पोहोचल्या असता घराचे मुख्य कुलूप तुटलेले आढळले. घरात प्रवेश केल्यानंतर बेडरूमचेही कुलूप तोडल्याचे दिसुन आले. बेडरूमम धील लाकडी कपाटातील कपडे अस्ताव्यस्त करण्यात आले होते. गोदरेज कंपनीच्या लॉकरची तपासणी केली असता लॉकरच गायब असल्याचे निदर्शनास आले. चोरी गेलेल्या मुद्देमाला मध्ये सुमारे १ किलो ३४४ ग्रॅम चांदीचे दागिने व विविध चांदीच्या वस्तु , तसेच १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे बिस्कीटचा समावेश आहे. चोरी गेलेल्या चांदीच्या वस्तूंची अंदाजे किंमत १९ हजार रुपये, तर सोन्याच्या बिस्किटाची अंदाजे किंमत ७९ हजार रुपये असा एकुण सुमारे ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान चोरी गेलेला लॉकर घराच्या मागील बाजुस असलेल्या वेकोलि रोडलगतच्या नाल्यात तुटलेल्या अवस्थेत व रिकामे मिळुन आल्याचेही तक्रारीत नमुद आहे. बुधवार (दि.५) ऑगस्ट रोजी सायंका ळी ७ वाजेपासुन ते शुक्रवार (दि.७) ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजे पर्यंतच्या कालावधीत अज्ञात व्यक्तीने घरात बेकायदेशीर प्रवेश करून चोरी केली. याप्रकरणी कन्हान पोलीसांनी लता नगरकर यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांचा मार्गदर्शना त कन्हान पोलीस करीत आहे .

Popular Articles