Home Latest News सी. पी. राधाकृष्णन देशाचे १५ वे उपराष्ट्रपती : राष्ट्रपती मुर्मूंकडून शपथ

सी. पी. राधाकृष्णन देशाचे १५ वे उपराष्ट्रपती : राष्ट्रपती मुर्मूंकडून शपथ

0

<p>&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;<p><strong>नवी दिल्ली १२ &colon;<&sol;strong> महाराष्ट्राचे माजी राज्यपाल <strong>चं<&sol;strong>द्रपूरम पोन्नुसामी &lpar;सी&period; पी&period;&rpar; राधाकृष्णन à¤¯à¤¾à¤‚नी आज &lpar;१२ सप्टेंबर&rpar; देशाचे à¥§à¥« वे उपराष्ट्रपती à¤®à¥à¤¹à¤£à¥‚न शपथ घेतली&period; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पदाची शपथ दिली&period; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक म्हणून कार्यास सुरुवात करून उपराष्ट्रपती पदापर्यंतचा त्यांचा प्रवास उल्लेखनीय मानला जात आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>एनडीए उमेदवार म्हणून लढलेल्या राधाकृष्णन यांनी ४५२ मते मिळवत विजय मिळवला&period; विरोधी इंडिया आघाडीचे उमेदवार बी&period; सुदर्शन रेड्डी यांना ३०० मते मिळाली&period; या निवडणुकीत विशेष म्हणजे&comma; एनडीएच्या बाहेरील १४ खासदारांनी राधाकृष्णन यांना पाठिंबा दिल्यामुळे विरोधकांच्या मतांत फूट पडली&period; त्यामुळे राधाकृष्णन यांचा विजय अधिक भक्कम ठरला&period;<&sol;p>&NewLine;<p>राधाकृष्णन यांचा जन्म ४ मे १९५७ रोजी तामिळनाडूतील तिरुपूर येथे झाला&period; बीबीए पदवीधर असलेल्या राधाकृष्णन यांनी वयाच्या १६ व्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात स्वयंसेवक म्हणून प्रवेश केला&period; १९७४ मध्ये भारतीय जनसंघाच्या विद्यार्थी संघटनेत सक्रिय झाले&period; पुढे १९९६ मध्ये तामिळनाडू भाजपचे सचिव म्हणून त्यांची नियुक्ती झाली&period;<&sol;p>&NewLine;<p>१९९८ व १९९९ मध्ये ते कोयंबतूर लोकसभेवरून सलग दोनदा निवडून आले&period; खासदारकीच्या काळात त्यांनी वस्त्रोद्योग संसदीय स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषवले&comma; तसेच सार्वजनिक उपक्रम आणि अर्थविषयक सल्लागार समित्यांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली&period; २००४ मध्ये संसदीय शिष्टमंडळाच्या सदस्य म्हणून त्यांनी संयुक्त राष्ट्र महासभेत भारताचे प्रतिनिधित्व केले&period;<&sol;p>&NewLine;<p>२००४-०७ दरम्यान त्यांनी तामिळनाडू भाजपचे अध्यक्षपद भूषवले&period; या काळात त्यांनी ९३ दिवसांची आणि तब्बल १९&comma;००० किमीचा प्रवास करणारी रथयात्रा काढून पक्ष संघटन मजबूत केले&period; २०१६ मध्ये कोची येथील कॉयर बोर्डाचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी ४ वर्षांत नारळ तागाच्या निर्यातीला विक्रमी २&comma;५३२ कोटी रुपयांपर्यंत नेले&period;<&sol;p>&NewLine;<p>यानंतर २०२०-२२ दरम्यान ते केरळ भाजपचे प्रभारी राहिले&period; फेब्रुवारी २०२३ मध्ये त्यांची झारखंडचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली&period; २०२४ मध्ये त्यांना तेलंगणा आणि पुद्दुचेरीचे अतिरिक्त राज्यपालपद देण्यात आले&comma; तर जुलै २०२४ मध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला&period;<&sol;p>&NewLine;<p>भाजप अध्यक्ष जे&period; पी&period; नड्डा यांनी १७ ऑगस्ट २०२५ रोजी त्यांची एनडीए उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी जाहीर केली होती&period; अखेर १२ सप्टेंबर रोजी ते देशाचे १५ वे उपराष्ट्रपती म्हणून शपथबद्ध झाले आणि आता ते आगामी पाच वर्षे या जबाबदारीच्या पदावर कार्यरत राहणार आहेत&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version