spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

प्रतिबंधीत सुगंधित तंबाखुची विक्री साठवणुक करणाऱ्या आरोपीविरूद्ध गुन्हा नोंद

एमआयडीसी बोरी :-  रोजी एमआयडीसी बोरी पोलीस पेट्रोलींग करीत असतांना गुप्त बातमीदारद्वारे माहिती मिळाली की, महिला आरोपी हिने तिच्या किराणा दुकाना मध्ये महाराष्ट्रात प्रतिबंध असलेला सुंगधीत तंबाखु विकी करीता साठा करून ठेवले आहे. मिळालेल्या माहीतीच्या आधारे पोलीसांनी मौजा गांगापुर झोपडपट्टी येथे जावुन पंचासमक्ष महिला आरोपीच्या दुकानाची झडती घेतली असता महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला सुंगधीत तंबाखु मिळुन आला. पोलीसांनी पंचासमक्ष एकूण ९ सिलबंद पॅकेट मधील प्रतिबंधीत सुंगधीत तंबाखु किंमती १६८०/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

नमुद आरोपीविरूद्ध पोस्टे एमआयडीसी बोरी येथे भारतीय न्याय संहीता अन्वये गुन्हा नोंद केला आहे.

Popular Articles