किशोर साहू, मौदा :- जिल्हा परिषद आदर्श शाळा घोटमुंढरी येथे सर्वज्ञ श्री.चक्रधर स्वामी यांचा प्रगट दीन कार्यक्रम उपस्थित मान्यवरांचे हस्ते साजरा करण्यात आला.
याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उदय पांडे, उपाध्यक्ष मंगलसिंग देवतारे, ग्रामपंचायत सदस्य शंकर पटले,शिक्षिका परिहार,खुरसुंगे, मोनाली पटले, ढोरे ,बागडे,आरती, प्रियंका श्रावणकर,आम्रपाली घरडे, कीर्ती पटले व सर्व विद्यार्थ्यी उपस्थितीत होते.
मुख्याध्यापक धारगावे यांनी या दिनाचे औचित्य साधून श्री.चक्रधर यांच्या कार्याची महती सांगून, विद्यार्थ्यांना ध्यान व शैक्षणिक महत्व पटवून देऊन मार्गदर्शन केले.मनोज वंजारी यांनी आभार प्रदर्शन करीत कार्यक्रमाच्या समारोप केला.





