Home Latest News केळापूरचा चैतन्य डहाके बनला चार्टर्ड अकाउंटंट, ग्रामीण युवकाने साधले प्रेरणादायी यश

केळापूरचा चैतन्य डहाके बनला चार्टर्ड अकाउंटंट, ग्रामीण युवकाने साधले प्रेरणादायी यश

0

<p><strong>पांढरकवडा &colon;- <&sol;strong>पांढरकवडा आर्थिक अडचणींवर मात करत केळापूर येथील चैतन्य गणेश डहाके या तरुणाने चार्टर्ड अकाउंटंट &lpar;CA&rpar; परीक्षेत यश संपादन करत गावाचे नाव उज्ज्वल केले आहे&period; पोस्ट ऑफिसमध्ये पोस्ट मास्टर या पदावर कार्यरत असलेल्या वडिलांचा मुलगा असलेला चैतन्य ग्रामीण भागातून येऊनही कठोर परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर हे यश मिळविण्यात यशस्वी ठरला आहे&period; चैतन्यने आपले प्राथमिक शिक्षण केळापूर गावातील जिल्हा परिषद शाळेत पूर्ण केले&period; पांढरकवडा येथील महिला समाज शाळेतून दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर&comma; त्याने जिल्हा परिषद महाविद्यालयातून बारावी &lpar;विज्ञान शाखा&rpar; मध्ये ७४ टक्के गुण मिळवले&period; पुढील शिक्षणासाठी त्याने नागपूरचा मार्ग धरला&period; घरची आर्थिक परिस्थिती तशी साधी असल्याने त्याने किरायाने खोली घेऊन स्वतःच स्वयंपाक करत शिक्षण सुरू ठेवले&period; या काळात अनेक अडचणींचा सामना करावा लागला&semi; तरीही त्याच्या जिद्दीने आणि मेहनतीने त्याला यश मिळवून दिले&period; चैतन्यच्या या यशामागे त्याचे वडील पोस्ट मास्टर गणेश डहाके&comma;आई&comma;आजी&comma;आजोबा&comma;काका&comma; काकू यांचे प्रोत्साहन आणि सुमित मंचलवार यांचे सहकार्य मोठ्या प्रमाणात लाभले&period; या यशामुळे केळापूर आणि परिसरात आनंदाचे वातावरण असून&comma; ग्रामस्थांनी चैतन्यचे अभिनंदन केले आहे&period;&OpenCurlyDoubleQuote;ग्रामीण भागात राहूनही कठोर परिश्रम आणि आत्मविश्वास असेल&comma; तर कोणतेही स्वप्न साकार करता येते&comma;”असे चैतन्यने आपल्या यशाबद्दल बोलताना सांगितले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version