spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’ उपक्रमाच्या लोगोचे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण

मुंबई :- मृद व जलसंधारण विभागाच्यावतीने जलसंधारण दिनानिमित्त २१ ऑगस्ट रोजी राज्यव्यापी ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’ उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून, या उपक्रमाच्या लोगोचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आले.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्यासह मंत्रिमंडळातील इतर सदस्य उपस्थित होते.

२१ ऑगस्ट रोजी राज्यभर जलसंधारण दिन, १५ ते २१ ऑगस्टदरम्यान जलसंधारण सप्ताह आणि १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत जलसंधारण अभियान राबविण्यात येणार असून, राज्यव्यापी ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’, जलसंधारणाची शपथ, युवकांसाठी लघुचित्रफीत स्पर्धा, शाळा-महाविद्यालयांमध्ये विविध स्पर्धा असे विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.