spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य शासकीय सोहळ्याची मंत्रालयात रंगीत तालीम

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 15 ऑगस्टला होणार मंत्रालयात ध्वजारोहण

मुंबई :- स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या राजशिष्टाचार विभागामार्फत परिपूर्ण तयारी करण्यात आली आहे. शनिवारी, 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9.05 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण होणार असून, त्यानिमित्त ध्वजारोहण समारंभाची रंगीत तालीम घेण्यात आली.

आजच्या या रंगीत तालीमत राजशिष्टाचार विभागाचे अवर सचिव अविनाश सोलवट यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर उपस्थित पोलीस दलाच्या पथकांनी ध्वजाला मानवंदना दिली. या रंगीत तालीमेत मुंबई पोलीस, राज्य राखीव पोलीस दल तसेच घोडेस्वार पथक सहभागी झाले.

यावेळी पोलीस दल, मुख्यमंत्री सुरक्षा दल यांच्यासह राजशिष्टाचार विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, लोकायुक्त, मुंबईतील मंत्री, खासदार, आमदार, मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, मुख्य निवडणूक आयुक्त, मुख्य माहिती आयुक्त, महावाणिज्य दूतावासांचे अधिकारी यांच्यासह विविध संवैधानिक संस्था व शासकीय विभागांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर, सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाचे अध्यक्ष, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा, राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू तसेच भारतीय सेना, नौदल, वायुदल आणि भारतीय तटरक्षक दलाचे वरिष्ठ अधिकारी या समारंभास उपस्थित राहणार आहेत.

स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य शासकीय सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मंत्रालय परिसरात सुरक्षा, संचलन, ध्वजारोहण आणि समारंभाच्या अन्य व्यवस्थांची तयारी पूर्ण करण्यात आली असून, रंगीत तालीमेद्वारे विविध व्यवस्थांची पाहणी करण्यात आली. या रंगित तालीम सोहळ्यात कलाकार किरण शिंदे,अरूण शिंदे आणि विवेक शिंदे यांनी सनई वादन केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.