spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कौतुकास्पद: पत्रकार राजु कापसे राज्यपालांकडून सन्मानित

– पंढरपूर येथे सन्मान सोहळ्यात झाला भव्य सत्कार

सचिन चौरसिया,प्रतिनिधी रामटेक :- व्हाईस ऑफ मिडिया पत्रकार संघटना, रामटेक शाखेचे अध्यक्ष राजु कापसे यांना पंढरपूर येथे झालेल्या ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या राज्य अधिवेशनात राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते ‘राज्यस्तरीय उत्कृष्ट तालुकाध्यक्ष’ पुरस्काराने गौरविण्यात आले. राज्यातील फक्त पाच तालुकाध्यक्षांचा यात समावेश असून, त्यात राजु कापसे यांची निवड विशेष ठरली. रामटेकात शाखा स्थापन केल्यानंतर त्यांनी अनेक उपक्रम राबवून संघटनेची ताकद वाढवली. त्यांच्या कार्याची दखल घेऊन राज्यस्तरीय समितीने हा सन्मान दिला. अधिवेशनात उद्योजक राणा सूर्यवंशी, इस्कॉन प्रकल्प प्रमुख प. पू. प्रल्हाद दास, श्रीकृष्ण चैतन्य महाराज, आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या प्रेमळ स्वभावाच्या माध्यमातुन त्यांनी रामटेकातच नव्हे तर आसपासच्या इतर अनेक तालुक्यात संघटनेच्या शाखा सुरु करण्यात व संघटना मजबुत व मोठी करण्यात मोलाची भुमीका बजावली आहे. या सर्व कामाची दखल घेत राज्यस्तरीय निवड समितीने राजु कापसे यांची या पुरस्कारासाठी निवड केली. पंढरपुर येथील अधिवेशनात यावेळी नागपुर जिल्ह्यातुन व्हाईस आफँ मिडिया नागपूर जिल्हा अध्यक्ष दिलीप घोरमारे, मौदा तालुका अध्यक्ष संदीप गौरखेडे, व्हाइस आँफ मिडिया रामटेक शाखा उपाध्यक्ष रुपेश वनवे, कोषाध्यक्ष रामरतन गजभिये, पारशिवनी शहर प्रतिनिधी सुनील डोमकी, कैलास निघोट, राजु गुप्ता, दिक्षित महाराज, हिंगणा अध्यक्ष इंगळे सर, गजभिये सर आदी. उपस्थीत होते. या सन्मानाबद्दल नागपूर जिल्ह्यातील व विविध तालुक्यांतील पदाधिकारी यांनी कापसे यांचे अभिनंदन केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.