नागपूर :- कोणालाही कोणत्याही वयात ऐकू न येण्याचा त्रास होऊ शकतो. मात्र सुरूवातीला याकडे दुर्लक्ष केले जाते. ऐकू न येण्याच्या या समस्येकडे दुर्लक्ष करू नये. कारण भविष्यात याचा आणखी त्रास वाढतो हे लक्षात घेऊन डेन्मार्क टेक्नॉलॉजीद्वारे निर्मित ओटीकॉन, ऑरीट्रॉन तसेच इंटरटोन कंपनीचे अधिकृत १९९८ पासून सेवा देत असलेले महाराष्ट्र कर्णयंत्र स्पीच थेरपी सेंटर, मेडीकल चौक, संगम हॉटेल जवळ, आय.सी.आय. सी.आय.बँकेच्या बाजुला तसेच दुसरी शाखा महाराष्ट्र कर्णयंत्र स्पीच थेरपी सेंटर, बजरंगनगर, हकिमी पेन्ट्स जवळ, सिद्धेश्वर सभागृहाच्या बाजुला, मानेवाडा रोड, नागपूर येथे सर्व प्रकारच्या ऑडियोलॉजीकल व स्पीच असेसमंट टेस्ट व थेरपीची सुविधा उपलब्ध आहे. येथे लहान बाळाची ओ.ए.ई.टेस्ट, बेरा टेस्ट, इम्पीडन्स टेस्ट, स्पीच ऑडियोमेट्री, फ्रिफिल्ड ऑडीयोमेट्री सर्व प्रकार, आकाराचे डिजीटल, रिचार्जेबल कर्णयंत्र उपलब्ध आहे. जसे जन्मः बहिरेपणाने ग्रस्त बालक युवकांमध्ये ध्वनी प्रदूषण किंवा अन्य कारणामुळे आलेला बहिरेपणा तसेच वृद्धावस्थामध्ये नस नाड्याचा कमजोरीपणाने आलेल्या बहिरेपणाला श्रवणयंत्राने निश्चितच फायदा पोहचविला जाऊन मानसिक त्रासाला त्वरीत सुटका मिळू शकते. पूर्ण नाव नोंदणी केलेल्या रूग्णांची सर्वसामान्य कानाची तपासणी केल्यानंतर डिजीटल ऑडियोमीटरद्वारे बहिरेपणाची तपासणी करून तपासणीमध्ये आढळलेल्या दोषाच्या आधारे मार्गदर्शन करण्यात येईल. तपासणीचा लाभ घेण्याचे आवाहन ऑडियोलॉजीस्ट व स्पीच लॅग्वेज पॅथॉलॉजिस्ट ऋतुजा सोनवाने किंवा मेयो हॉस्पीटलचे माजी ऑडियोलॉजीस्ट मनोहर सोनवाने यांनी केले आहे.
महाराष्ट्र हिअरिंग अँन्ड स्पीच थेरपी सेंटर येथे संपूर्ण ऑडियोलॉजीकल टेस्ट व उपचार संभव – ऋतुजा सोनवाने









