Home Latest News काँग्रेस खासदार पडोळे यांच्या गाडीचा भीषण अपघात : उमरेड फाट्याजवळ पहाटेची घटना,...

काँग्रेस खासदार पडोळे यांच्या गाडीचा भीषण अपघात : उमरेड फाट्याजवळ पहाटेची घटना, नक्षलप्रभावित भागात सुरक्षा नसल्याचा आरोप

0

<p>&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;<p><strong>भंडारा १२ &colon;<&sol;strong> उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आटोपून मुंबईमार्गे भंडाऱ्याकडे परतत असताना काँग्रेसचे खासदार डॉ&period; प्रशांत पडोळे यांच्या वाहनाला पहाटे भीषण अपघात झाला&period; नागपूर बायपासवरील उमरेड फाट्याजवळ काल सकाळी सहाच्या सुमारास घडलेल्या या अपघातात मोठा अनर्थ टळला&period; डॉ&period; पडोळे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्या फार्च्युनर &lpar;एमएच 36 एपी 9911&rpar; गाडीचे मोठे नुकसान झाले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>घटनेच्या वेळी खासदार स्वतः वाहनात होते&period; दिल्ली येथे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदान करून ते विमानाने मुंबईत दाखल झाले होते&period; तेथील कार्यालयीन काम आटोपून भंडाऱ्याकडे परतत असताना उमरेड फाट्याजवळ समोरून आलेल्या वाहनामुळे संतुलन बिघडले आणि जोरदार धडक बसली&period; अपघात गंभीर स्वरूपाचा असला तरी खासदार पडोळे व त्यांच्यासोबत प्रवास करणारे सहकारी सुखरूप आहेत&period; घटनेची माहिती मिळताच कार्यकर्त्यांमध्ये चिंता पसरली होती&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>सुरक्षा न मिळाल्याची खंत<&sol;strong><br &sol;>&NewLine;भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील मोठा भाग नक्षलप्रभावित आहे&period; अशा भागात असूनही शासकीय सुरक्षा उपलब्ध करून न दिल्याची खंत खासदार पडोळे यांनी व्यक्त केली&period; भाजप सरकारकडे वारंवार मागणी करूनही सुरक्षा न मिळाल्याने या अपघातानंतर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>डॉ&period; पडोळे यांच्या जखमा सौम्य असून त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले आहेत&period; या घटनेनंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी &OpenCurlyDoubleQuote;सरकारला आता तरी जाग येईल का&quest;” असा सवाल उपस्थित केला आहे&period; स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेऊन वाहन रस्त्याच्या कडेला हलवले असून पुढील चौकशी सुरू आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version