spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी; वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश

कामठी :- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त येरखेडा नगर पंचायतच्या वतीने त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यात आले. यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, सामाजिक कार्य आणि समतेच्या विचारांचा जागर करत त्यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला.

जयंतीनिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी स्वतः वृक्षारोपण करून “हरित येरखेडा, स्वच्छ येरखेडा”चा संकल्प व्यक्त केला. पर्यावरणाचे संरक्षण ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असून, भावी पिढ्यांसाठी हिरवेगार वातावरण निर्माण करण्यासाठी अधिकाधिक वृक्ष लागवड व त्यांचे संगोपन करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

या कार्यक्रमास येरखेडा नगर पंचायतचे नगराध्यक्ष राजकिरण बर्वे, भारतीय जनता पार्टी कोराडी मंडळ अध्यक्ष ब्रह्माजी काळे, जयराम मेहरकुळे (सिव्हिल सहाय्यक), विशाल भुते, उपाध्यक्ष रंजना काळे, स्वच्छता सभापती नरेश मोहेबे, नगरसेवक गजानन तिरपुडे, नगरसेविका मनिषा गोंडाणे, नगरसेवक सुशांत सलाम, मनोज बडवाईक, नगरसेविका मंदा महाले, महिला मोर्चा अध्यक्षा राजेश्री घिवले, व्यापारी आघाडी अध्यक्ष ईश्वर चौधरी, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष राकेश खरोले, सरिता भोयर, जया वाढीभस्मे, शीला बंडीवार, प्रशांत काळे, मनिष भाटी, अंकित वाघ, आयुष कानोजिया, चिन्मय महाले तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमामुळे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना अभिवादन करण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश समाजापर्यंत पोहोचला. उपस्थितांनी अण्णाभाऊंच्या समता, सामाजिक न्याय आणि मानवतेच्या विचारांचा अंगीकार करून समाजहितासाठी कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Popular Articles