spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

८ ऑगस्टपर्यंत एसआयआरचे काम १०० टक्के पूर्ण करा;-मुख्यधिकारी विनोद जाधव

कामठी :- आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक व त्रुटीमुक्त करण्यासाठी सुरू असलेल्या एस आय आर मोहिमेचा आढावा घेण्यासाठी सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा मुख्याधिकारी विनोद जाधव यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

या बैठकीस नायब तहसीलदार अनिल मोरे, नायब तहसीलदार सारिका धात्रक, तसेच एसआयआर कामात कार्यरत नगरपरिषद कामठीचे सर्व नोडल अधिकारी आणि बीएलओ पर्यवेक्षक उपस्थित होते.

बैठकीत मतदार यादी पुनरिक्षणाचे काम निर्धारित मुदतीत व काटेकोरपणे पूर्ण करण्यावर विशेष भर देण्यात आला. सर्व बीएलओंना ८ ऑगस्ट २०२६ पर्यंत आपल्या कार्यक्षेत्रातील मतदार यादी पुनरिक्षणाचे काम १०० टक्के पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले.

याशिवाय प्रत्येक बीएलओने संबंधित राजकीय पक्षांच्या बूथ लेव्हल एजंट यांच्यासोबत बैठक घेऊन अनुपस्थित स्थलांतरित मृत आणि डुप्लिकेट मतदारांची स्वतंत्र यादी तयार करावी. सदर यादी बीएलएंना वाचून दाखवून त्याबाबतचे इतिवृत्त तयार करून संबंधित कार्यालयात सादर करण्याचे आदेशही देण्यात आले.

मतदार यादीतील त्रुटी दूर करून प्रत्येक पात्र नागरिकाला मतदानाचा अधिकार सुनिश्चित करण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वय, पारदर्शकता आणि जबाबदारीने काम करण्याचे आवाहन सहायक मतदार नोंदणी अधिकारी विनोद जाधव यांनी यावेळी केले.

Popular Articles