Home Latest News सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र कायम; पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० कार्यकर्त्यांचा पक्षत्याग

सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र कायम; पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० कार्यकर्त्यांचा पक्षत्याग

0

<h3><&sol;h3>&NewLine;<p><strong>सोलापूर &colon;<&sol;strong> à¤­à¤¾à¤œà¤ªà¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ नव्या शहर कार्यकारिणीवरून सोलापूरमध्ये नाराजीचे वादळ उठले आहे&period; शहर उपाध्यक्ष अनंत जाधव यांनी बुधवारी कार्यकारिणी जाहीर होताच दोन तासांच्या आत राजीनामा दिल्यानंतर शुक्रवारी चिटणीस श्रीकांत घाडगे यांनीही पदाचा राजीनामा दिला&period; याचदरम्यान विविध पदांवर सक्रिय असलेल्या ५० हून अधिक कार्यकर्त्यांनीही पक्षाचे सदस्यत्व सोडले&period;<&sol;p>&NewLine;<p>शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी बुधवारी कार्यकारिणी जाहीर केली होती&period; मात्र&comma; निवडीमध्ये धनगर समाजाकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करण्यात आला&period; या समाजातील प्रशांत फत्तेपूरकर&comma; राम वाकसे&comma; राज बंडगर यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी बैठकीनंतर सामूहिक राजीनामे दिले&period; त्यांनी आपली नाराजी व्यक्त करत पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन निवेदनही सादर केले&period; आणखी काही जुने कार्यकर्तेही लवकरच पक्षत्याग करतील&comma; अशी शक्यता राम वाकसे आणि राज बंडगर यांनी व्यक्त केली&period;<&sol;p>&NewLine;<p>दरम्यान&comma; भाजपातील अंतर्गत राजकारणामुळे नाराजी वाढत चालली आहे&period; आमदार विजयकुमार देशमुख यांची शुक्रवारी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली&period; या भेटीत महापालिका निवडणुकीच्या तयारीसह भाजपातील अलीकडील घडामोडींवर चर्चा झाल्याचे समजते&period; सध्या भाजपामध्ये आमदार सुभाष देशमुख&comma; आमदार विजयकुमार देशमुख&comma; आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे या चार आमदारांमध्ये सुप्त संघर्ष सुरू असल्याची चर्चा आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>पालकमंत्री गोरे आणि आमदार देशमुख यांच्या भेटीत &OpenCurlyQuote;महापालिकेत पुन्हा सत्ता आणण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करणे आवश्यक आहे’ असा संदेश देण्यात आला&period; मात्र&comma; या बैठकीस देशमुख गटातील प्रमुख शिलेदार अनुपस्थित राहिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version