किशोर साहू, मौदा :- विद्यार्थ्यांच्या बौद्धिक ,सांस्कृतिक व शारीरिक सर्वांगीण विकास साधण्यासाठी आनंददायी शनिवार उपक्रम राबविण्यात मौदा तालुक्यात प्रसिद्ध असलेल्या प्रणाग हायस्कूल आजनगाव येथे या शनिवार (1 ऑगस्ट) ला लोकशाही पद्धतीने शालेय मंत्रिमंडळाच्या निवडीसाठी भारतीय लोकशाही पद्धतीने निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यात आली.
लोकशाहीतील अत्यंत महत्त्वाचा घटक, लोकशाहीचा आत्मा म्हणजे पारदर्शी निवडणूक पद्धत यांची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, निवडणुकीची कार्य पद्धतीचे ज्ञान मिळावे, विद्यार्थ्यांना राज्यशास्त्र व नागरिक शास्त्र या विषयाची प्रात्यक्षिक माहिती व्हावी तसेच राजकीय निवडप्रक्रिया, कार्यपद्धती इ. ची माहिती मिळावी ही बाब लक्षात घेऊन प्रतिवर्षी शाळेत हा उपक्रम राबवला जातो.

विद्यार्थी स्वपसंतीने शाळा प्रमुखासह शालेय मंत्रिमंडळाची निवड करतात. ही निवडणूक मतपत्रिकेद्वारे घेण्यात आली. तसेच यासह प्रनाग शाळेतील विद्यार्थी बँकेच्या प्रतिनिधीची सुद्धा निवड करण्यात आली. विद्यार्थी बँकेचे कामकाज विद्यार्थ्यांसह कार्यवाह म्हणून शिक्षक गुणरत्न गजभिये यांनी पार पाडले. तर शालेय सार्वत्रिक निवडणूक 2026-27 हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे सर्व विद्यार्थी, मुख्याध्यापक बाबुलकर , शिक्षक सुरेश टांगले, राजू गेडाम, गुनरत्न गजभिये, लिपिक सुनील डोंगरे, मदतनीस क्षिरसागर परिश्रम घेतले.





