spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

जिल्हास्तरीय प्रथम ‘आदिशक्ती पुरस्काराने ‘कवठा’ ग्रामपंचायतीचा गौरव

कामठी :- महिला सक्षमीकरण, लोकसहभागातून ग्रामविकास आणि प्रभावी प्रशासनाची यशस्वी अंमलबजावणी यामुळे कामठी तालुक्यातील कवठा ग्रामपंचायतीला जिल्हास्तरीय प्रथम ‘आदिशक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या मानाच्या पुरस्कारामुळे संपूर्ण गावासह कामठी तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. राज्यातील महिला व बालकांची मोठ्या प्रमाणात असलेली लोकसंख्या व राज्यातील महिलांच्या जीवनात येणाऱ्या समस्या व त्यांच्या सबलिकरण संदर्भात भेडसावणाऱ्या समस्यां ज्यामध्ये प्रामुख्याने महिलांच्या आर्थिक , सामाजिक ,शैक्षणिक व आरोग्य विषयक समस्या जाणून घेऊन त्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने राज्यात सन 2025-2026 पासून महाराष्ट शासनाच्या महिला व बाल विकास विभागातर्फे आदिशक्ती राबविण्याचा निर्धार करण्यात आला व आदिशक्ती अभियान उत्कृष्टपणे राबविणाऱ्या ग्रामपंचायतींना आदिशक्ती पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्याबाबतचा 22 मे 2025 च्या शासन निर्णयांनव्ये आदेश निर्गमित करण्यात आला होता. त्यानुसार आदिशक्ती अभियानात कामठी तालुक्यातील कवठा ग्रामपंचायत्नेही सहभाग घेतला ज्यात उत्कृष्ट भूमिका साकारली परिणामी शासनातर्फे आदीशक्ती अभियान उत्कृष्टपणे राबविणाऱ्या ग्रामपंचायतिचे सन 2025-26चे राज्यस्तरीय,जिल्हास्तरीय व तालुकास्तरिय पुरस्कार जाहीर करण्यात आले त्यानुसार जिल्हास्तरीत पुरस्कारात नागपूर जिल्ह्यातील कामठी,पारशिवनी व नागपूर ग्रा या तीन तालुक्यातील प्रत्येकी एक ग्रामपंचायतीची जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली त्यात कामठी तालुक्यातील कवठा ग्रा प चा समावेश आहे.

कवठा ग्रामपंचायतीने सरपंच निलेश डफरे यांच्या पुढाकारातूनमहिला बचत गटांना बळकटी देणे, स्वच्छता अभियानाची प्रभावी अंमलबजावणी, शासकीय योजनांचा पारदर्शक लाभ ग्रामस्थांपर्यंत पोहोचविणे, सामाजिक उपक्रमांना चालना देणे आणि सर्वसमावेशक ग्रामविकास साधणे या क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केले. या सर्व कामांची दखल घेत जिल्हा प्रशासनाच्या वतीने ग्रामपंचायतीचा ‘आदिशक्ती प्रथम’ पुरस्काराने गौरव करण्यात आला.

या यशाबद्दल सरपंच निलेश डफरे, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, कर्मचारी, महिला बचत गट तसेच ग्रामस्थांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. हा पुरस्कार केवळ कवठा ग्रामपंचायतीचा सन्मान नसून, लोकसहभागातून घडणाऱ्या आदर्श ग्रामविकासाची राज्यासाठी प्रेरणादायी नोंद असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.