spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

निराधार योजनेतील पात्र लाभार्थी, लाभापासून वंचित,निराधार योजनेचे प्रलंबित अनुदान त्वरित वितरित करा

 – सावनेर तालुका सरपंच संघटनेचे तहसीलदारांना निवेदन

– निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचे अनुदान तात्काळ वितरित करा – सरपंच संघटनेचा आमरण ऊपोषणाचा ईशारा…

खापा वार्ताहर :- सावनेर तालुक्यातील इंदिरागांधी वृद्धापकाळ निराधार व इंदिरागांधी विधवा निराधार योजनचे हजारो लाभार्थी गेल्या एक वर्षापासुन योजनेच्या लाभापासून वंचित आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचे प्रलंबित अनुदान तात्काळ वितरित करण्यात यावे. अशी मागणी सावनेर तालुका सरपंच संघटनेने केली आहे. याप्रसंगी सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर गणविर यांच्या नेतृत्वात सावनेर तालुका सरपंच संघटनेच्या वतीने संजय गांधी निराधार विभाग सावनेर, नायब तहसीदार संजय अनव्हाने यांना निवेदन देण्यात आले.

सावनेर तालुक्यातील इंदिरा गांधी वृद्धापकाळ व इंदिरा गांधी विधवा निराधार योजनेचे लाभार्थी गेल्या १ (एक) वर्षापासून योजनेच्या लाभापासून वंचित आहे. त्यामुळे या लाभार्थ्यांवर ऊपासमारीची वेळ आली आहे. सदर योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात एक वर्षाचा कालावधी होत असतांना सुध्दा मानधन अद्यापही जमा झाले नाही. त्यामुळे सध्या परिस्थितीत हजारो लाभार्थ्यांना घर चालवणेही कठीण झाले आहे. अनेक जण किराणा, औषधे आणि दैनंदिन गरजांसाठी इतरांवर अवलंबून आहेत. काही लाभार्थी अर्धपोटी दिवस काढत आहेत, तर काहींना भिकेची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने DBT प्रणाली कार्यान्वित होईपर्यंत जुनी ऑफलाइन पद्धत लागू करून थकीत मानधन त्वरीत द्यावे, अशी मागणी लाभार्थ्यांकडुन सुध्दा होत आहे.

सदर योजनेतील खरोखर पात्र लाभार्थीना या योजनेचा फटका बसलेला आहे. त्यामुळे या लाभार्थ्यांना लाभ मिळावा म्हणून शासनाने याबाबीची गंभीर दखल घेऊन या योजनेतील लाभार्थ्यांना तात्काळ अनुदान वितरित करावे किंवा सदर लाभार्थ्यांना श्रावण बाळ योजनेमध्ये समाविष्ट करून थांबलेले १(एक) वर्षांचे अनुदान त्वरित वाटप करण्यात यावे. अशी मागणी सावनेर तालुका सरपंच संघटनेनी केली आहे.

अनुदान वाटप करण्यात विलंब केल्यास सावनेर तालुका सरपंच संघटनेच्या वतीने बेमुदत आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचा ईशारा यावेळी देण्यात आला. याप्रसंगी सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष किशोर गणविर, सावनेर तालुका महासचिव अनेश रोकडे सरपंच बिचवा, अशोक डवरे तालुका कोषाध्यक्ष सरपंच सावंगी हेटी, होमेश्वर पानपते सरपंच ब्रम्हपुरी, अंजु ललीत चौरेवार सरपंच किरणापुर, दिपाली ठाकरे सरपंच नागलवाडी, हरिश चौधरी ऊपसरपंच कोथुळणा, सचिन गजभिये सरपंच खैरी पंजाबराव, राहुल भुसारी ऊपसरपंच, शिवशंकर टोंगे सरपंच जोगो आदिंची ऊपस्थिती होती.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.