spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

असे प्रत्येक संमेलन मानवी जीवनाला दिशादर्शक ठरेल

– नगरधन येथे मानव धर्माचे सेवक संमेलन उत्साहात 

– संमेलनात २५ हजार सेवकांची हजेरी

सचिन चौरसिया,प्रतिनिधी रामटेक :- परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ, नागपूर व परमात्मा एक सेवक परिवार, नगरधन यांच्या संयुक्त विद्यमाने मानव धर्माचे भव्य सेवक संमेलन नगरधन येथील नर्सरी परिसरात मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडले. या संमेलनाला विविध भागातून जवळपास २५ हजार सेवकांनी हजेरी लावली. या भव्य सेवक संमेलनाची सुरुवात सकाळी मानव धर्मावर आधारित भव्य रथयात्रेने झाली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळुजी शेळके होते. उद्घाटन नरेंद्र बंधाटे यांच्या हस्ते पार पडले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमांचे पूजन व माल्यार्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमात मानव धर्मातील चार तत्वे, तीन शब्द, पाच नियम, सेवकांचे अनुभव, जागृती तसेच अंधश्रद्धा निर्मूलन या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात बाळुजी शेळके यांनी सेवकांना मार्गदर्शन करतांना महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी नेहमी सेवकांमध्ये एकता ठेवण्याचा संदेश दिला. सेवकांमध्ये मतभेद होऊ देऊ नका. ना साधू ना संत, महानत्यागी बाबा जुमदेवजी अनंत, असे प्रतिपादन त्यांनी केले. या प्रसंगी रथयात्रेत सहभागी झालेल्या झाकी, लेझीम पथक, दांडिया पथक आदींना मान्यवरांच्या हस्ते प्रोत्साहनपर बक्षिसे व सन्मानचिन्हे देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी तिन्ही मंडळांचे मार्गदर्शक श्रावण बावनकुळे, जगन जांभुळकर, हरिश्चंद्र बावनकुळे तसेच तिन्ही मंडळांचे अध्यक्ष रमेश बिरणवार गुरुजी, उमेश गायधने, लक्ष्मण तरारे यांच्यासह परिसरातील मार्गदर्शक व अध्यक्षांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी सरपंच माया दमाहे, उपसरपंच श्रीराम धोपटे, गौरीशंकर माहुले, मनोज कुंभलकर, मोहित इखार, अनिल येळणे, अर्जुन बच्छोरे, पो.पा. नितेश सावरकर, आनंद रामेलवार, संतोष चाफले, महेश राने, राकेश बिरणवार, सतीश बंधाटे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular Articles