spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अन् त्या चौकाचे होणार ‘छत्रपती शिवाजी महाराज चौक’ नामकरण

– नगराध्यक्षांकडून १९ फेब्रुवारीला नामकरणाचे आश्वासन

सचिन चौरसिया,प्रतिनिधी रामटेक :- शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या रामटेक बसस्थानक समोरील चौकास ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक’ असे अधिकृत नाव देण्यात यावे, या मागणीसाठी राष्ट्रीय बजरंग दलाच्या वतीने नगरपरिषद प्रशासनाला निवेदन देण्यात आले. या चौकात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, अखंड भारताचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य व प्रेरणादायी स्मारक उभारण्यात आलेले आहे. या स्मारकास दररोज मोठ्या संख्येने नागरिक, विद्यार्थी, महिला, युवक तसेच बाहेरून येणारे प्रवासी व भाविक भेट देत असतात. कोणतेही सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अथवा राष्ट्रहिताचे कार्य सुरू करण्यापूर्वी येथे महाराजांना मानवंदना अर्पण करून केली जाते. हे स्मारक रामटेक शहराच्या आदर्श, प्रेरणास्थान व जीवनमूल्यांचे प्रतीक आहे. शहराच्या राष्ट्रप्रेम, स्वाभिमान व संस्काराची प्रतीक ठरलेल्या या चौकाला महाराजांचे नाव देण्याची नागरिकांची दीर्घकालीन भावना असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. नगराध्यक्ष बिकेंद्र महाजन यांनी तात्काळ दखल घेत १९ फेब्रुवारी रोजी चौकास ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक’ असे नामकरण करण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद, राष्ट्रीय बजरंग दल चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular Articles