spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मोटार पंप सुरू करतांना विद्युत करंट लागून शेतकऱ्याचा मृत्यू

साळवा :-  कुही तालुक्यातील वेलतूर पोलीस स्टेशन अंतर्गत तारोली येथे शेतातील पिकाला पाणी देण्यासाठी विहिरीवरील मोटार पंप सुरू करतांना विजेचा करंट लागून दि. 6 ऑक्टोबर रोजी दिनेश चंद्रभान गोहणे वय 52 यांचा जागेवरच मृत्यू झाला.

चंद्रभान गोहणे यांचे तारोली शिवारात शेत आहे. शेतातील धानाच्या पिकाला पाणी देण्यासाठी सायंकाळी 6:30 वाजता शेतात गेले. शेतातील विहिरीवर असलेली मोटार पंप सुरू करीत असताना विजेच्या जिवंत तारेला स्पर्श होऊन त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. वडील शेतातून घरी आले नाही म्हणून मुलगा कौस्तुभ याने वडिलांच्या मोबाईलवर फोन केला असता प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे शेतात जाऊन बघितले असता सिमेंट पोलवर टांगलेल्या विद्युत पंप सुरू करण्याच्या पेटीजवळ पडून होते. त्यांच्या उजव्या हाताजवळ जिवंत विद्युत तार पडलेली होती. अंगठ्याजवळील भाग काळसर पडल्याचे दिसून आले. मुलगा कौस्तुभ दिनेश गोहने याने वेलतूर पोलीस स्टेशनला माहिती दिली असता पोलिसांनी अकास्मात मृत्यूची नोंद करून चौकशी करीत आहेत

Popular Articles