spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

दोन दिवसीय इंडक्शन कम ओरिएंटेशन कार्यक्रम

सचिन चौरसिया प्रतिनिधी

रामटेक :- कविकुलगुरु इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड सायन्स (किट्स) रामटेक येथे अभीयांत्रिकीच्या द्वितीय ऑटोनॉमस बॅचच्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी दोन दिवसीय इंडक्शन कम ओरिएंटेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सिल्व्हर जुबली सभागृहात या कार्यक्रमाचे संस्थापक अध्यक्ष व्ही. राजेश्वरराव यांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था सचिव व्ही. श्रीनिवासराव तर प्रामुख्याने प्राचार्य डॉ. अविनाश श्रीखंडे, प्रथम वर्ष विभागप्रमुख डॉ. के. गजानन, प्रवेश समन्वयक श्रीनिवास रायडू, विविध विभाग प्रमुख, डीन, प्राध्यापक यांची प्रमुख उपस्थिती होती. एकूण ५८२ विद्यार्थी व त्यांचे पालक या कार्यक्रमात सहभागी झाले. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात व्ही. श्रीनिवासराव म्हणाले की किट्सला ४० वर्षांचा गौरवशाली इतिहास आहे. संस्थेला नॅक ‘ए’ ग्रेड व यूजीसी ऑटोनॉमस दर्जा प्राप्त झाला आहे. प्राचार्य डॉ. श्रीखंडे यांनी पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनद्वारे संस्थेची प्रगती व विविध विभागांची माहिती सादर केली. या वर्षी किट्समध्ये महाराष्ट्रासह इतर राज्यांतील विद्यार्थ्यांनी सुद्धा प्रवेश घेतला असून १०० टक्के प्रवेश पूर्ण झाला आहे. प्राध्यापकांचा परिचय विभाग प्रमुख डॉ. के. गजानन यांनी तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. अंजली नरड यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा.श्रीनिवास रायडू यांनी केले. कार्यक्रम समन्वयक प्रा. योगिराज बकाले व त्यांच्या टीमने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.

Popular Articles