सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक :- घोटी रमजान येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत आयोजित शेती शाळेत भात पीक परिसंस्था निरीक्षणे, कामगंध सापळे व पक्षी थांबे, खोडकिडा, तुडतुडे, भुंगेरे आदी कीड तसेच करपा, कडाकरपा रोगाची ओळख, नियंत्रण व उपायांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यासोबतच पाणी व्यवस्थापना तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांची शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली. डिजिटल साधनांचा वापर कसा करायचा याबाबत महाविस्तार एआय अॅपचा प्रचार व प्रसिद्धी करण्यात आली. याप्रसंगी उपकृषी अधिकारी वाघमारे, सहाय्यक कृषी अधिकारी जी. व्ही. काकडे, एम. एम. भोरे, उपसरपंच देविदास भलावी, पंकेश कोकोडे तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




