spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

प्रहार जनशक्ती तालुकाध्यक्ष प्रदीप निशाने 12 ऑक्टोबर करणार मुंडीकोटा येथे आमरण उपोषण

तिरोडा :- जिल्ह्यातील तसेच तालुक्यातील आणि मुंडीकोटा परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना मूलभूत सुविधा व न्याय मागण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाप्रमुख प्रदीप निशाने यांनी जिल्हाधिकारी यांना आपल्या मागण्यांचे निवेदन १३/८/२०२५ सादर केले होते त्यानंतर १९/ ९ २०२५ ला जिल्हाधिकारी व संबंधित विभागांना स्मरणपत्र देऊन सुद्धा संबंधित विभागाने आणि जिल्हाधिकाऱ्यांनी पत्राची कोणतीही दखल न घेता किंवा इतर कोणतीही चौकशी न करता न्याय मागण्यासाठी कोणतीही उपाययोजना किंवा पत्र व्यवहार केलेला नाही त्यामुळे निवेदनात आणि स्मरण पत्रात स्पष्ट उल्लेख केला असल्याने परिसरातील जनतेच्या न्याय हक्कासाठी १२ ऑक्टोंबर पासून आमरण उपोषण करणार असल्याचे पत्र ६ ऑक्टोंबर २०२५ जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागाला देण्यात आले प्रामुख्याने मुंडीकोटा येथे पोलीस चौकीला पोलीस स्टेशन बनविण्यात यावे ही प्रमुख मागणी त्यांनी लावून धरली तसेच मुंडीकोटा या क्षेत्रात अनेक लहान-मोठे असून खेडे पाडे असून उपकेंद्राला ४५ हजार लोकसंख्या असलेल्या केंद्रावर आरोग्याच्या दृष्टीने खूप मोठा भार असल्याने तेथे ग्रामीण रुग्णालय मंजूर करण्यासाठी निवेदन अर्ज सादर करण्यात आला धापेवाडा उपसा सिंचन योजनेचे पाणी सालेबर्डी सोनाली बिरोली घाटकुरोडा या अंतिम टप्प्याच्या गावांना पोहोचत नसल्याने ते पाणी पोहोचविण्यासाठी आंदोलन करणार असे पत्रात नमूद केले होते गोंदिया जिल्ह्यातील जीवन वाहिनी असलेली गोंदिया इतवारी नागपूर मेमो ट्रेन सुरू करण्यात यावी तसेच गाव तिथे एसटी या ब्रीदवाक्य असला तरी अजून पर्यंत मुंडीकोटा क्षेत्रातील अनेक गावात एसटी पोहोचलेली नाही त्यामुळे या क्षेत्रातील गावांना बस सुरू करण्यात यावे मुंडीकोटा येथे जागृती सहकारी पतसंस्था ही नावाजलेली असली तरी मागील १० वर्षापासून ही व्यवहारिक बंद असून थकीत कर्जदारांना जप्तीचे नोटीस देण्यात येत आहे ते जप्तीचे नोटीस रद्द करण्यात यावे मुंडीकोटा हे गाव मोठे व्यापारी केंद्र असले तरी या गावात व क्षेत्रात एकमेव आयडीबीआय बँक आहे तरी ही बँक वरच्या मजल्यावर असून दिव्यांगांना आणि शेतकरी वृद्धांना खूप मोठा त्रास सहन करावा लागतो त्यामुळे ही बँक खाली तळमजल्यावर देण्यात यावी किंवा त्या ठिकाणी दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी लिफ्टची व्यवस्था करण्यात यावी प्राथमिक आरोग्य केंद्र मुंडीकोटा येथे असले तरी आरोग्य कर्मचारी मुख्यालय न राहता किंवा ते आरोग्य केंद्रास वेळेवर हजर न होता त्यामुळे अनेक रुग्णांची रेफर टू तुमसर किंवा रेफर टू तिरोडा अशी चिठ्ठी लिहून देतात किंवा महिला जास्त खाजगी डॉक्टरांपर्यंत तपासणी करावी लागते त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना मुख्यालय राहण्याचे आदेश देण्यात यावे जिल्ह्यातील दिव्यांगाचे अंतोदयचे राशन कार्ड तातडीने बनवण्यात यावे शेतकऱ्यांकडे असलेले परंपरागत पशुधन यांना सरकारी विमाद्वारे संरक्षण देण्यात यावे ज्यामुळे त्यांचे मृत्यू झाल्यास त्यांना जिल्हा परिषद द्वारे सानुग्रह रासी उपलब्ध करता येईल अशा न्याय मागण्यासाठी जिल्हाधिकार्यालय यांना निवेदन द्वारे सात दिवसाच्या आत अहवाल सादर करावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदन आणि स्मरण पत्र मागील दोन महिन्यापूर्वी तालुकाप्रमुख प्रदीप निशाने यांनी जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आले होते त्यामुळे झालेला पत्रव्यवहाराच्या कडून संबंधित अधिकाऱ्यांनी कोणतीही दखल न घेता कोणत्याही पत्र व्यवहार केलेला नाही किंवा तसे चौकशी किंवा मागण्या पूर्ण करू अशी ग्वाही देखील दिलेली नाही त्यामुळे प्रहार जनशक्ती पक्ष ॲक्शन मोडवर असून येत्या १२ ऑक्टोबरला मागण्या मान्य होईपर्यंत आमरण उपोषण सुरू राहणार असे पत्र जिल्हा अधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्याला देण्यात आले आहे त्यामुळे आता या आमरण उपोषणाच्या आंदोलनामुळे प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे जिल्हावासीयाचे लक्ष वेधलेले आहे.

Popular Articles