spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

पशुवैद्यकीय रुग्णालयात औषध वितरणात धांदली – युवक जागर संघटनेचा आरोप

नागपूर १० : दिनांक ९ जुलै, बुधवार रोजी युवक जागर संघटनेच्या वतीने सौरभ चट्टे यांच्या नेतृत्वाखाली आणि संदीप देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या वेळी संघटनेच्या सर्व युवक पदाधिकाऱ्यांनी औषध वितरणात सुरू असलेल्या धांदळीबाबत थेट डॉक्टरांसमोर उघड केला.

काही दिवसांपूर्वी डॉ. प्रवेश हे त्यांचा पाळीव कुत्रा लुसी याला घेऊन नागपूरच्या जिल्हा पशुवैद्यकीय रुग्णालयात आले होते. जिल्ह्यातील नागरिक चांगल्या उपचारासाठी याच रुग्णालयात आपल्या पाळीव प्राण्यांना घेऊन येतात आणि समाधानकारक उपचारांची अपेक्षा करतात. मात्र, शासनाच्या उदासीनतेमुळे आणि अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे या रुग्णालयात औषध वितरणात मोठ्या प्रमाणावर अनियमितता सुरू झाली आहे. याचे ठळक उदाहरण डॉ. प्रवेश यांच्याबाबत समोर आले आहे.

लुसी या कुत्र्याला लिपोमा या आजारामुळे शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात आणण्यात आले असता, त्याला स्ट्रेचरवर ठेवण्यासाठीदेखील कोणी कर्मचारी उपलब्ध नव्हते. तपासणीनंतर डॉ. भोजने यांनी १०० मि.ली. DNS आणि १५० मि.ली. RL देण्याचे सुचवले. मात्र, इंटर्न विद्यार्थ्यांकडून फक्त वापरलेली बाटलीच दिली जात होती.

डॉ. प्रवेश यांनी विचारले की, संपूर्ण औषध दिले जात नाही का? त्यावर विद्यार्थ्यांनी उत्तर दिले की, “हेच औषध आम्हाला फार्मसीकडून मिळाले आहे.” यानंतर आणखी एक धक्कादायक बाब समोर आली – २५० मि.ली. DNS ची MRP ₹३२ असूनही ₹३५ आकारले गेले, आणि प्रत्यक्षात केवळ १०० मि.ली. दिले गेले. तसेच, २५० मि.ली. RL ची किंमत ₹५० असूनही कमी प्रमाण दिले गेले आणि त्याचेही जास्त पैसे घेतले गेले.

यावर डॉ. आकरे यांना निवेदनाद्वारे प्रश्न विचारण्यात आले. त्यांनी उत्तर दिले, “ही चूक अनावधानाने झाली असावी. आमच्याकडे अशा प्रकारची धांदली होत नाही. हा रुग्णालय महाविद्यालयाद्वारे चालवला जातो, आणि येथेच सर्व औषधांचे वितरण होते जेणेकरून नागरिकांना मदत मिळावी.”

डॉ. आकरे यांनी सांगितले की, याबाबत सखोल चौकशी करून भविष्यात अशा चुका पुन्हा होणार नाहीत याची काळजी घेतली जाईल.

सरकार माणसांबरोबरच आता प्राण्यांवरही भ्रष्टाचार करत आहे का? युवक जागर संघटनेने सरकारला थेट हा सवाल केला आहे. याबाबत सखोल चौकशी करून संपूर्ण राज्यातील औषध वितरणातील अशा घोटाळ्यांचा पर्दाफाश करण्यात यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.”

या वेळी प्रतीक काथोटे, उमेश लांजेवार, विनोद धमनकर, इमरान शेख, लकी लांजेवार, मोनिका कुंभारे, वैभव मेश्राम, प्रतीक मोहाडे, नारायण मोहाडीकवार इत्यादी युवक उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.