spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कोदामेंढी येथे उद्या निशुल्क महाआरोग्य शिबिर

किशोर साहू, मौदा :- रविवार (ता.१ मार्च)ला दुपारी दहा ते दोन वाजेपर्यंत श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी तर्फे ग्रामीण भागातील गरजू नागरिकांसाठी आरोग्य सेवा विस्तार अभियान अंतर्गत कोदामेंढी येथील ग्रामपंचायत कार्यालय समोरील पटांगणात निशुल्क महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरात नेत्ररोग, अस्थिव्यंगोपचार, मेंदूरोग , मूत्ररोग, कान, नाक घसा ,कर्करोग ,जनरल मेडिसिन , पोटाचे विकार, हृदयरोग ,ईसीजी, जनरल सर्जरी, बालरोग, दंतरोग, श्वसन विकार व क्षयरोग या सर्व रोगांवर तज्ञ डॉक्टरांकडून निशुल्क तपासणी, औषधोपचार, चष्मे व आवश्यक असल्यास शस्त्रक्रियाही ठराविक दिवशी बोलावून करण्यात येणार आहे.

तरी कोदामेंढी व परिसरातील गरजू नागरिकांनी या भव्य निशुल्क महाआरोग्य शिबिराच्या लाभ घेण्याचे आव्हान महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.