Home Latest News अन्न सुरक्षेबाबत एफएसएसएआयचे राज्यांना कडक निर्देश नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा

अन्न सुरक्षेबाबत एफएसएसएआयचे राज्यांना कडक निर्देश नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा

0

<p><strong>&&num;8211&semi; अन्न हाताळणीसाठी फक्त फूड-ग्रेड व गंजरोधक उपकरणे वापरणे बंधनकारक<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नवी दिल्ली &colon;-<&sol;strong> भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने देशातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना अन्न सुरक्षा नियमांची काटेकोर व प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत&period; अन्न हाताळणी&comma; प्रक्रिया आणि पॅकिंग करताना केवळ फूड-ग्रेड&comma; विषमुक्त आणि गंजरोधक सुरी&comma; ब्लेड तसेच इतर कापण्याची उपकरणे वापरणे बंधनकारक असल्याचे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>एफएसएसएआयने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार&comma; काही अन्न व्यवसायांमध्ये गंजलेल्या&comma; तडे गेलेल्या&comma; खराब झालेल्या अथवा रंग लावलेल्या सुरी व कापण्याच्या साधनांचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे&period; अशा उपकरणांमुळे अन्नामध्ये भौतिक&comma; रासायनिक आणि सूक्ष्मजीवजन्य दूषितीकरण होण्याची शक्यता असून त्यामुळे ग्राहकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो&comma; असे प्राधिकरणाने म्हटले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>अन्न तयार करणे&comma; प्रक्रिया करणे&comma; पॅकिंग करणे आणि साठवणूक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व उपकरणांचा तसेच अन्नाच्या संपर्कात येणाऱ्या पृष्ठभागांचा दर्जा फूड-ग्रेड व गंजरोधक असणे आवश्यक असल्याचे निर्देश देण्यात आले आहेत&period; तसेच अशा उपकरणांची नियमित स्वच्छता&comma; निर्जंतुकीकरण आणि देखभाल करण्यावर भर देण्यात आला आहे&period; गंज&comma; तडे&comma; रंग निघणे किंवा इतर दोष असलेली उपकरणे तात्काळ बदलण्याच्या सूचनांसह अन्न व्यवसायांनी स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या सर्व मानकांचे काटेकोर पालन करावे&comma; असेही एफएसएसएआयने स्पष्ट केले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>या निर्देशांचे उल्लंघन झाल्यास अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम&comma; २००६ तसेच संबंधित नियमांनुसार कठोर कारवाई करण्यात येईल&comma; असा इशारा प्राधिकरणाने दिला आहे&period; राज्य अन्न सुरक्षा आयुक्त&comma; परवाना प्राधिकरणे आणि अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना तपासणीदरम्यान विशेष दक्षता बाळगण्याचे तसेच नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध आवश्यक ती कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version