Home Latest News हुंड्यासाठी नवविवाहितेचा छळ, लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यातच संपवलं जीवन, डॉक्टर पतीला अटक

हुंड्यासाठी नवविवाहितेचा छळ, लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यातच संपवलं जीवन, डॉक्टर पतीला अटक

0

<p><strong>अंबरनाथ &colon;-<&sol;strong> अंबरनाथमध्ये धक्कादायक घटना घडली आहे&period; एका 26 वर्षीय नवविवाहितेने लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यात हुंड्यासाठीच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे&period; याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत या नवविवाहितेच्या डॉक्टर पतीला अटक केली आहे&period; या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे&period; या घटनेनं अंबरनाथमध्ये खळबळ उडाली आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>लग्नानंतर विशाखाला हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक त्रास<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>पत्नीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी घरात आणि घराबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे&comma; शेजाऱ्यांशी बोलल्यास मारहाण करणे&comma; तसेच माहेरून पैसे आणि दागिने आणण्यासाठी दबाव टाकणे&comma; असे गंभीर आरोप मृत विवाहितेच्या कुटुंबीयांनी केले आहेत&period; विशाखा टिळेकर असं या 26 वर्षीय मृत नवविवाहितेचं नाव होतं&period; अंबरनाथमधील डॉ&period; नितीन टिळेकर याच्यासोबत 30 एप्रिल 2026 रोजी तिचं लग्न झालं होतं&period; लग्नापूर्वी सगळं सुरळीत होतं&comma; मात्र लग्नानंतर विशाखाला हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक त्रास देण्यास सुरुवात झाली&period; लग्नात अपेक्षेप्रमाणे मानपान मिळालं नाही&comma; माहेरून पैसे आणि दागिने आणले नाहीत&comma; यासाठी तिचा सतत मानसिक आणि शारीरिक छळ सुरू होता&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>पत्नीवर लक्ष ठेवण्यासाठी रात आणि घराबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>इतकंच नव्हे&comma; तर पत्नी दिवसभर काय करते&comma; कोणाशी बोलते आणि कुठे जाते यावर लक्ष ठेवण्यासाठी पती डॉ&period; नितीन टिळेकर याने घरात आणि घराबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते&period; विशाखाला तिच्या माहेरच्यांशी बोलण्यास सुद्धा मज्जाव करण्यात आला होता&period; दोन दिवसांपूर्वी शेजारच्या महिलेशी बोलल्याच्या कारणावरून विशाखाला पतीने मारहाण केली होती&period; आत्महत्या करण्यापूर्वी तिने आपल्यावर होत असलेल्या त्रासाबाबत आईला माहिती दिली होती&period; यानंतर आई-वडील तिला माहेरी घेऊन जाण्याची तयारी करत असतानाच विशाखाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली&period; याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त करणे&comma; हुंड्यासाठी छळ करणे यासह इतर कलमांनुसार पती डॉ&period; नितीन टिळेकर याच्यासह सासरच्यांवर गुन्हा दाखल केला असून नितीन टिळेकर याला बेड्या ठोकल्या आहेत&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version