Home Latest News 7 जणांसोबत मिळून प्रेयसीनंच केलं प्रियकराचं अपहरण

7 जणांसोबत मिळून प्रेयसीनंच केलं प्रियकराचं अपहरण

0

<p><strong>पुणे &colon;-<&sol;strong> अनेकदा चित्रपटांमध्ये किंवा खऱ्या आयुष्यात मुलींचे अपहरण करून त्यांच्याशी बळजबरीने लग्न करण्याचे प्रकार आपण ऐकतो किंवा पाहतो&period; पण पुण्यात याच्या अगदी उलट आणि अत्यंत थरारक असा प्रकार उघडकीस आला आहे&period; यात एका २७ वर्षीय तरुणीने चक्क आपल्या साथीदारांच्या मदतीने एका तरुणाचे लग्नासाठी भररस्त्यातून फिल्मी स्टाईलने अपहरण केले&period; हा भयंकर प्रकार उघडकीस आल्यानंतर पुणे पोलिसांनी थेट बीड जिल्हा गाठून या &&num;8216&semi;लेडी डॉन&&num;8217&semi;सह तिच्या ७ साथीदारांना बेड्या ठोकल्या आहेत&period;<&sol;p>&NewLine;<p>तपासानंतर या अपहरणामागचे जे कारण समोर आले&comma; ते पाहून पोलीसही चक्रावून गेले&period; चौकशीदरम्यान उघड झाले की&comma; आरोपी तरुणी आणि नीलेश यांची आधीपासून मैत्री होती&period; तिची नीलेशसोबत लग्न करण्याची तीव्र इच्छा होती&comma; मात्र नीलेश या लग्नासाठी अजिबात तयार होत नव्हता&period; अखेर तो ऐकत नाही हे पाहून या &&num;8216&semi;माथेफिरू&&num;8217&semi; तरुणीने आपल्या ७ साथीदारांना गोळा केले आणि नीलेशचे अपहरण करून त्याच्याशी बळजबरीने लग्न करण्याचा महाभयंकर कट रचला हा सर्व प्रकार पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील एका पेट्रोल पंपाजवळ घडला&period; फिर्यादी अजय लक्ष्मण बोद्रे &lpar;रा&period; शिंदेवाडी&comma; ता&period; हवेली&rpar; यांनी याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दिली आहे&period; २७ मे रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास अजय यांचा भाऊ नीलेश बोद्रे याला काही जणांनी रस्त्यात अडवले&period; त्याला बेदम मारहाण करत एका भाड्याच्या टुरिस्ट मोटारीत बळजबरीने कोंडले आणि तिथून सुसाट वेगाने पसार झाले&period;<&sol;p>&NewLine;<p>पोलीस नियंत्रण कक्षाला या घटनेची माहिती मिळताच लोणीकंदचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीता रोकडे यांनी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची कल्पना दिली&period; पोलीस आयुक्त अमितेश कुमार&comma; सहआयुक्त संजय दराडे आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखेसह लोणीकंद पोलिसांची ५ पथके तातडीने रवाना करण्यात आली&period;<&sol;p>&NewLine;<p>पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजवरून त्या टुरिस्ट गाडीचा क्रमांक मिळवला&period; ती गाडी येवलेवाडीतील एका व्यक्तीची होती&period; येवलेवाडीचे वरिष्ठ निरीक्षक मारुती पाटील यांच्या मदतीने पोलिसांनी गाडीच्या चालकाचा मोबाईल नंबर मिळवला आणि आरोपींचा माग काढण्यास सुरुवात केली&period; अखेर आरोपी बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे पोहोचले असता&comma; पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने तिथे धाड टाकून नीलेश बोद्रे याची सुखरूप सुटका केली&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version