spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

“गर्भावस्थेपासून वृद्धत्वापर्यंत शासनाची साथ” – सुहास गाडे

– भामरागड येथे मल्टिमीडिया प्रदर्शन; योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

गडचिरोली :- “नागरिकांच्या जीवनातील प्रत्येक टप्प्यावर—गर्भावस्थेपासून ते वृद्धत्वापर्यंत—शासन विविध जनकल्याणकारी योजना राबवत आहे. या योजनांचा नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा,” असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी केले.

जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलीस प्रशासन व सामाजिक न्याय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा माहिती कार्यालयामार्फत तहसील कार्यालय, भामरागड येथे शासनाच्या विविध योजनांवरील मल्टिमीडिया छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाची पाहणी करताना ते बोलत होते.

यावेळी गाडे यांनी विविध विभागांच्या योजनांची माहिती प्रत्यक्ष पाहून समाधान व्यक्त केले. दुर्गम व नक्षलग्रस्त भागातील नागरिकांपर्यंत शासनाच्या योजनांची माहिती प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे त्यांनी नमूद केले.

नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रदर्शनाला भेट देऊन शिक्षण, आरोग्य, कृषी, महिला व बालकल्याण, सामाजिक न्याय, रोजगार व कौशल्य विकास आदी विभागांच्या योजनांची माहिती जाणून घ्यावी व त्याचा लाभ घ्यावा, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

या प्रदर्शनामध्ये विविध योजनांची माहिती मल्टिमीडिया दृकश्राव्य माध्यमांसह माहितीपर फ्लेक्स पॅनलद्वारे सादर करण्यात आली आहे. शासनाच्या प्रमुख योजना, पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया व लाभ याबाबत सविस्तर माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव व तहसीलदार किशोर बागडे उपस्थित होते.

Popular Articles