Home Latest News मारेगाव तालुका क्रीडा संकुलाचे भूमिपूजन उत्साहात

मारेगाव तालुका क्रीडा संकुलाचे भूमिपूजन उत्साहात

0

<p><strong>यवतमाळ &colon;-<&sol;strong> राज्य शासनाच्या क्रीडा विभागामार्फत मंजूर करण्यात आलेल्या 4 कोटी 5 लाख रुपये निधीच्या तालुका क्रीडा संकुलाचे भूमिपूजन आज मारेगाव येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले&period; या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन मौजा टाकरखेडा&comma; ता&period; मारेगाव&comma; जि&period; यवतमाळ येथील भूसंपादन क्र&period; 34&comma; क्षेत्र 2&period;00 हेक्टर शासकीय जागेवर विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर यांच्या हस्ते करण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p>यावेळी मारेगावचे तहसीलदार नीलवडे&comma; जिल्हा परिषद सदस्य अनिल पाटील देरकर&comma; नगराध्यक्ष डॉ&period; मनीष मस्के&comma; गटविकास अधिकारी वनखंडे&comma; तालुका क्रीडा अधिकारी शिल्पा चाबुस्कार&comma; माजी नगराध्यक्ष इंदु  किन्हेकर तसेच पुरुषोत्तमजी बुटे यांची प्रमुख उपस्थिती होती&period;<img class&equals;"alignnone wp-image-51196 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2026&sol;06&sol;मारेगावतालुकाक्रीडासंकुलाचेभूमिपूजनउत्साहात1&lowbar;copy&lowbar;800x556&period;webp" alt&equals;"" width&equals;"799" height&equals;"556" &sol;><&sol;p>&NewLine;<p>याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन करताना सांगितले की&comma; तालुक्यातील खेळाडूंना आधुनिक व दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हे क्रीडा संकुल महत्त्वपूर्ण ठरणार आहे&period; ग्रामीण भागातील युवक-युवतींना विविध क्रीडा प्रकारांमध्ये प्रगती करण्यासाठी या संकुलामुळे मोठी संधी उपलब्ध होणार असून&comma; राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडविण्यासाठी हे संकुल उपयुक्त ठरेल&comma; असा विश्वास त्यांनी व्यक्त केला&period;<&sol;p>&NewLine;<p>कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका क्रीडा अधिकारी शिल्पा चाबुस्कार यांनी केले&period; कार्यक्रमास नगरपंचायतीचे नगरसेवक&comma; नगरसेविका&comma; प्रतिष्ठित नागरिक&comma; क्रीडाप्रेमी तसेच मोठ्या संख्येने युवक-युवती उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p>कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश गौरकार यांनी केले&comma; तर आभार प्रदर्शन धनराज ठेपाले यांनी केले&period; तालुक्यातील क्रीडा विकासाच्या दृष्टीने हा प्रकल्प मैलाचा दगड ठरणार असल्याची भावना मान्यवरांनी व्यक्त केली&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version