नागपूर, १० : विभागात मागील तीन दिवसांपासून सर्वत्र जोरदार पाऊस पडत असल्यामूळे नदी व नाल्यांना पूर आला आहे. मागील चोवीस तासात 95.6 मीमी पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत 263.00 मीमी म्हणजेच सरासरी 72.62 टक्के पावसाची नोंद झाली आहे. विभागात 43 तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. हवामान खात्याने दिलेल्या ऑरेंज अलर्टमूळे नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिल्या आहेत.
विभागात मागील चोवीस तासात सर्वाधिक 139.6 मीमी पावसाची नोंद नागपूर जिल्ह्यात झाली असल्यामूळे सरासरी 94.8 टक्के पाऊस पडला आहे. वर्धा जिल्ह्यात 103.5 मीमी (63.5 टक्के), भंडारा 125.8 (89.3 टक्के), गोंदिया 66.6 (73 टक्के), चंद्रपूर 67.8 (60.6 टक्के), गडचिरोली 47.3 (66.5 टक्के) मीमी पावसाची नोंद झाली आहे. विभागात आतापर्यंत 263.1 मीमी म्हणजेच 72.62 टक्के पावसाची नोंद झाली आहे.
विभागातील 43 तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली असून यामध्ये नागपूर जिल्ह्यातील 13 तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली असून सर्वाधिक 222.2 मीमी पाऊसाची कुही तालुक्यात नोंद झाली आहे. भिवापूर 192.1 मीमी, उमरेड 180.1 मीमी, नागपूर शहर 170.5 मीमी, नागपूर ग्रामीण 149.3 मीमी, कामठी 158 मीमी, हिंगणा 158.3 मीमी, रामटेक 139.3 मीमी, पारशिवनी 103.9 मीमी, मौदा 143.4, काटोल 106, नरखेड 87, कळमेश्वर 186.8 मीमी पावसाची नोंद झाली आहे. वर्धा जिल्ह्यातील सर्व आठ तालुक्यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात 108.9 मीमी, कारंजा 123.8 मीमी, आष्टी 74.7 मीमी, वर्धा 91 मीमी, सेलू 99.3 मीमी, देवळी 78.8 मीमी, हिंगणघाट 128.3 तर समुद्रपूर तालुक्यात 106 मीमी पावसाची नोंद झाली आहे.
भंडारा जिल्ह्यातील सातही तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली असून यामध्ये भंडारा 132.2 मीमी, पवनी 149.7 मीमी, लाखांदूर 164.7 मीमी, लाखनी 83.6 मीमी, साकोली 75.2 मीमी, मोहाडी 85.8 मीमी तर तुमसर तालुक्यात 76.5 मीमी पाऊस पडला. गोंदिया जिल्ह्यातील तीन तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली असून यामध्ये देवरी 104.5, सडक अर्जुनी 120.6 तर मोरगाव अर्जुनी तालुक्यात 89.6 मीमी पाऊस पडला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात पाच तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली असून यामध्ये चिमूर 151.4, ब्रम्हपूरी 145.2, नागभिड 150.3, सावली 92.8 तर वरोरा तालुक्यात 82.4 मीमी पाऊस पडला आहे. गडचिरोली जिल्ह्यात सहा तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली असून यामध्ये वडसा-देसाईगंज 133.6, कोरची 82.5, धानोरा 70.5, आरमोरी 92.4, कुरखेडा 86.8 तर गडचिरोली तालुक्यात 76 मीमी पाऊसाची नोंद झाली आहे.





