Home Latest News महाराष्ट्रातील स्वयंसहाय्यता गटांचे यश पाहून मला अभिमान वाटतो” – निवासी आयुक्त आर. विमला

महाराष्ट्रातील स्वयंसहाय्यता गटांचे यश पाहून मला अभिमान वाटतो” – निवासी आयुक्त आर. विमला

0

<p><strong>&&num;8211&semi; नवी दिल्लीतील सरस जीवनोपार्जन मेळावा 2025 मध्ये महाराष्ट्रातील स्वयंसहाय्यता गटांचे खाद्यपदार्थ व हस्तकला उत्पादनांना दिल्लीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नवी दिल्ली<&sol;strong> &colon; नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद स्टेडियम येथे 5 ते 22 सप्टेंबर 2025 या कालावधीत आयोजित सरस जीवनोपार्जन मेळावा 2025 चे उद्घाटन केंद्रीय कृषी व किसान कल्याण तसेच ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या हस्ते झाले आहे&period; या मेळाव्यात महाराष्ट्रातील स्वयंसहाय्यता गटांनी &OpenCurlyQuote;व्होकल फॉर लोकल आणि &OpenCurlyQuote;स्वदेशी अपनाओ’ या संकल्पनांना चालना देणारे खाद्यपदार्थ आणि हस्तकला उत्पादनांचे स्टॉल आहेत&period; आज महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त आर&period; विमला यांनी सरस जीवनोपार्जन मेळावा 2025 ला भेट देऊन पाहणी केली&period;<&sol;p>&NewLine;<p>आर&period; विमला यांनी प्रत्येक स्टॉलला भेट देऊन तिथल्या उत्पादनांची बारकाईने पाहणी केली आणि अनेक उत्पादने खरेदी करून या गटांच्या कार्याला प्रोत्साहन दिले&period; त्यांनी स्वयंसहाय्यता गटाच्या सदस्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या उत्पादन प्रक्रिया&comma; आव्हाने आणि भविष्यातील योजनांबाबत चर्चा केली&period; त्यांनी या गटांच्या सशक्तीकरणासाठी आणि त्यांच्या उत्पादनांना राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळवण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचा सल्लाही दिला&period; यावेळी महाराष्ट्र सदनाच्या सहायक निवास आयुक्त स्मिता शेलार व महाराष्ट्र परिचय केंद्राच्या प्र&period; उपसंचालक मनिषा पिंगळे देखील उपस्थित होत्या&period;<img class&equals;"alignnone wp-image-12557 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;09&sol;Photo&lowbar;6&lowbar;copy&lowbar;800x600&period;jpg" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"600" &sol;><&sol;p>&NewLine;<p>केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान अंतर्गत आयोजित या मेळाव्यात देशभरातील 400 हून अधिक &OpenCurlyQuote;लखपति दीदीनी आपली उत्पादने प्रदर्शित केली&period; महाराष्ट्रातील 9 स्टॉल्सनी &OpenCurlyQuote;स्वदेशी अपनाओ’च्या भावनेने खाद्यपदार्थ आणि हस्तकला उत्पादनांद्वारे राज्याची समृद्ध संस्कृती सादर केली&period;<&sol;p>&NewLine;<p>राजमाता जिजाऊ महिला उमेद गटाने सेंद्रिय डाळी&comma; चिली पावडर आणि नैसर्गिक अन्नपदार्थ सादर करून खवय्यांचे मन जिंकले आहे&period; जय मल्हार महिला स्वयंसहाय्यता गटाच्या घरगुती आंबा व मिश्र लोणच्यांना मोठी मागणी मिळत आहे&period; रुक्मिणी महिला बचत गटाने पारंपारिक कोल्हापुरी चप्पलांना राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळवली आहे&comma; तर वारली आर्ट्स गटाच्या वारली चित्रांना आणि पेन होल्डर्सना दिल्लीकरांचे आकर्षण मिळत आहे&period; तुळजाभवानी स्वयंसहाय्यता गटाच्या नाविन्यपूर्ण लाकडी हस्तकला व नाव प्लेट्सना उत्तम प्रतिसाद मिळत आहे&period; भैरवनाथ गटाच्या सुगंधी अगरबत्ती आणि धूप यांना विशेष लोकप्रियता मिळत आहे&period; ओम साई महिला बचत गटाच्या कोकणातील काजू आणि आंबा पदार्थांनी खवय्यांना भुरळ घातली आहे&comma; तर कोहिनुर महिला गटाच्या रंगीत हातमाग कालीन आणि बेडशीट्सना चांगला प्रतिसाद मिळत आहे&period; भाग्यलक्ष्मी गटाने खास महाराष्ट्रीयन पुरणपोळी&comma; वडापाव आणि विविध पारंपरिक पदार्थ सादर केले असून&comma; हे पदार्थ चवीने आस्वादत दिल्लीकरांना खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची चव अनुभवायला मिळत आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>हा मेळावा 22 सप्टेंबर 2025 पर्यंत मेजर ध्यानचंद स्टेडियम&comma; नवी दिल्ली येथे सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत खुला आहे&period; प्रत्येक स्टॉलला उत्तम प्रतिसाद मिळत असून&comma; हा मेळावा ग्रामीण भारताच्या उद्योजकतेला प्रोत्साहन देत आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version