Related Posts

ई-वाहनांना टोलमाफीची आठ दिवसात अंमलबजावणी करा – विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर

<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> राज्यातील ईव्ही व ई-बाइक वापरकर्त्यांना टोलमाफी देण्याबाबत पुढील आठ दिवसांत कार्यवाही करावी&comma; असे स्पष्ट निर्देश देत या निर्णयाच्या अंमलबजावणी पासून आज पर्यंतच्या काळात टोल घेतला गेला असल्यास पुरावा सादर केल्यावर नागरिकांना टोल परतावा द्यावा&comma; असे आदेश विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड&period; राहुल नार्वेकर यांनी दिले&period;<&sol;p>&NewLine;<p>ई वाहनांना टोल माफी देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे&period; या संदर्भात काढलेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याची बाब सदस्य अनिल पाटील यांनी विधानसभेत मांडली&period; त्यावर अध्यक्ष अ‍ॅड&period; नार्वेकर यांनी हे निर्देश दिले&period;<&sol;p>&NewLine;<p>अध्यक्ष ॲड&period; नार्वेकर यांनी राज्यातील अपुऱ्या चार्जिंग स्टेशन्सचा मुद्दाही उपस्थित करत&comma; ई-वाहनांसाठी किमान 120 के&period;डब्लू&period; &lpar;kw&rpar; क्षमतेची फास्ट चार्जिंग स्टेशन्स उभारण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले&period; सध्या उपलब्ध चार्जिंग स्टेशन्सवर वाहन चार्जिंगसाठी आठ तास लागत असल्याने ही व्यवस्था तातडीने सुधारावी&comma; असेही त्यांनी म्हटले&period;<&sol;p>&NewLine;<p>प्रश्नाला उत्तर देताना मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले की&comma; महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण 2025 अंतर्गत समृद्धी महामार्ग&comma; मुंबई–पुणे द्रुतगती महामार्ग आणि शिवडी–न्हावाशेवा अटल सेतू या मार्गांवर ई-वाहनांना टोलमाफीचे धोरण 23 मे 2025 रोजी जाहीर करण्यात आले असून 22 ऑगस्ट 2025 पासून अंमलबजावणी सुरू आहे&period; ईव्ही फास्टटॅग रजिस्ट्रेशन&comma; एनआयसी डेटाबेसमधील नोंदणी आणि बँक इंटिग्रेशनची प्रक्रिया सुरू असल्याचे मंत्री भुसे यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;