spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर कामठी नगर परिषद च्या वतीने फॉगिंग मशीनने फवारणी सुरू करा- विरोधी गट नेता काशीनाथ प्रधान

कामठी :- मुस्लिम समाजबांधवांचा श्रद्धेचा व पवित्र महिना असलेल्या रमजान माह च्या पाश्वरभूमीवर कामठी शहरात अस्वच्छतेवर नियंत्रण साधण्यासाठी कामठी नगर परिषद च्या वतीने स्वछतेवर भर देत नाली सफाई करणे,ब्लिचिंग पावडर मारणे,फॉगिंग मशीनने धूर फवारणी करने यासारख्या उपाययोजना करण्याची मागणी कामठी शहरवासियाच्या वतीने कामठी नगर परिषद चे विरोधी गट नेता व नगरसेवक काशिनाथ प्रधान सह आदी नगरसेवकांच्या वतीने मुख्याधिकारी विनोद जाधव व नगराध्यक्ष अजय अग्रवाल यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

याप्रसंगी नगरसेवक धीरज यादव, प्रदीप भोकरे, नियाज अहमंद,अहफाज अहंमंद,अनिल सूर्यवंशी, सातीका खांडेकर,रंजना पानतावणे आदींनी केली आहे.

Popular Articles