– ‘अंबाखोरी’ येथे ‘हर हर महादेव’चा गजर
सचिन चौरसिया, प्रतिनिधी रामटेक :- पेंच राष्ट्रीय उद्यानातील दाट जंगले नैसर्गिक सौंदर्याने वेढलेल्या विदर्भातील प्राचीन तीर्थक्षेत्र अंबाखोरी येथे महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वर्षातून एकदाच एका दिवसासाठी उघडले जाते. रामटेक तालुक्यातील घनदाट जंगलात असलेल्या सातपुडा पर्वताच्या खोलगटात लपलेले मोठे धबधबा असलेल्या रामटेकपासून ४० किलोमीटर अंतरावर जंगलाच्या मधोमध वसलेले हे पवित्र स्थान अंबाखोरी घनदाट जंगलात स्वयंनिर्मित शिवलिंग अंबाखोरी तोतलाडोहचे अप्रतिम दृश्य डोंगरावरून कोसळणारा धबधबा शिवपिंडावर पडतो. धबधब्यांमध्ये भगवान शिव एका गुहेत ‘पिंडाच्या’ रूपात राहतात. १९६८ पासून येथे महाशिवरात्री उत्सव सतत साजरा केला जात आहे. पेंच प्रकल्पात असलेल्या सिल्लारी वनपरिक्षेचा अंतर्गत असलेल्या अंबाखोरी येथे सकाळपासूनच शिवभक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली होती. यावेळी शिवलिंगाचे प्रथम पूजेचे मान भाजप देवलापार मंडळ अध्यक्ष राज हरणे यांच्या हस्ते करण्यात आले. या वर्षी भाविकांचा उत्साह इतका प्रचंड होता की अंबाखोरी रस्त्यावर ३ ते ४ किलोमीटर वाहनांची गर्दी उभी राहिली. पार्किंगसाठी जागा नसल्याने भाविकांना गुहेच्या मंदिरात चालत जावे लागले. वन विभागाने बसेसची व्यवस्था केली असली तरी त्या अपुर्या होत्या. देवलापर पोलिस आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांना गर्दी नियंत्रित करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. हे मंदिर पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या मुख्य क्षेत्रात असल्याने, १९९५ पासून वन विभागाच्या नियमांनुसार, सामान्य लोकांना वर्षातून फक्त एकदाच (महाशिवरात्री) येथे मोफत प्रवेश मिळतो. म्हणूनच या दुर्मिळ संधीचा फायदा घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. अंबाखोरी देवस्थान ट्रस्टी रामविलास शर्मा हे शिवभक्तांच्या दर्शनाची करिता लोकांना मार्गदर्शन करताना दिसत होती. शिवभक्तांकडून या ठिकाणी महाप्रसादाचे व्यवस्था करण्यात आलेली होती. वन विभागाचे वनपरिक्षेञ अधिकारी विवेक राजुरकर यांनी शिवभक्तांना कुठलाही त्रास होऊ नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवलेला होता.




