– परीक्षा केंद्रांच्या नावात दुरुस्ती; विद्यार्थ्यांनी नोंद घेण्याचे आवाहन
यवतमाळ :- जवाहर नवोदय विद्यालय, बेलोरा ता. घाटंजी, जि. यवतमाळ येथील इयता 6 वी शैक्षणिक सत्र 2026-27 करिता निवड चाचणी शनिवार दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे. ही परीक्षा सकाळी 11 ते दुपारी 01.30 या वेळेत यवतमाळ जिल्ह्यातील 56 परीक्षा केंद्रांवर होणार असून या परीक्षेचे प्रवेश पत्र विद्यार्थ्यांनी cbseitms.rcil.gov.in या संकेत स्थळावरून डाउनलोड करून घ्यावे.
दारव्हा, दिग्रस, मारेगाव, राळेगाव व उमरखेड या तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या प्रवेश पत्रामध्ये दिलेल्या परिक्षा केंदाच्या नावांमध्ये दुरुस्ती करण्यात आली असून प्रत्यक्ष परिक्षा देण्यासाठी केंद्राचे सुधारीत नावे खालील प्रमाणे कळविण्यात आली आहे.
आर्ट, कॉमर्स व सायन्स ज्युनिअर कॉलेज, मारेगाव ता. मारेगाव जि. यवतमाळ, सैनिक पब्लिक स्कुल वडकी, ता. राळेगाव जि. यवतमाळ, कस्तुबा कन्या विद्यालय ढाणकी, ता. उमरखेड जि. यवतमाळ, शिवाजी हायस्कूल दारव्हा, ता. दारव्हा जि. यवतमाळ, वी बी घेरवारा विद्यालय दारव्हा, ता. दारव्हा जि. यवतमाळ, उमाबाई कानीकर विद्यालय दारव्हा, ता. दारव्हा जि. यवतमाळ, अभ्यासा इंग्लिश मिडीअम स्कुल दारव्हा, ता. दारव्हा जि. यवतमाळ, एम एन उर्दू हायस्कुल तथा ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स दारव्हा, ता. दारव्हा जि. यवतमाळ, दिनबाई विद्यालय दिग्रस, ता. दिग्रस जि. यवतमाळ, मोहनाबाई गर्लस् हायस्कुल दिग्रस, ता. दिग्रस जि. यवतमाळ या प्रमाणे परिक्षा केंदाच्या नावांमध्ये दुरुस्ती करण्यात आली असून विद्यार्थी, पालक व संबधित शिक्षकांनी याची नोंद घ्यावी.
परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी प्रवेश पत्रात दिलेल्या परीक्षा केंद्रावर परीक्षेच्या एक तास अगोदर उपस्थित रहावे. असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालय बेलोरा ता. घाटंजी येथील प्राचार्य के.डी. धोपटे यांनी केले आहे.




