हंसराज, भंडारा कारधा :- अवैध रेती वाहतुकीवर अंकुश लावण्यासाठी कारधा पोलिसांनी धडक कारवाई करत एक ट्रॅक्टर व रेतीसह ७,०६,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस शिपाई गडदे व त्यांचे पथक गस्तीवर असताना, आरोपी लकी धनराज मेश्राम (२१, रा. मंडणगाव) हा स्वराज कंपनीच्या ट्रॅक्टरने (क्र. MH 36 Z 8509) विनापरवाना एक ब्रास रेतीची वाहतूक करताना आढळून आला. पोलिसांनी ६ लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर, १ लाखाची ट्रॉली आणि ६ हजार रुपयांची रेती असा एकूण ७ लाख ६ हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध कारधा पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ५६५/२६, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) आणि मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे आणि पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.








