spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

खैरे कुणबी समाज पश्चिम नागपूरतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

नागपूर :- खैरे कुणबी समाज पश्चिम नागपूरच्या वतीने दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा रविवारी कुसुमताई वानखेडे सभागृह येथे उत्साहात पार पडला. समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करण्याबरोबरच त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रेरणा देण्याचा उद्देश या कार्यक्रमामागे होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निलेश महाजन होते. प्रमुख वक्ते म्हणून डॉ. दिलीप भोयर, पुनीत मातोकर, रत्नाकर मुळींक तसेच डॉ. महेश महाजन उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रातील विविध संधी, स्पर्धा परीक्षा, करिअर नियोजन आणि यशस्वी भवितव्यासाठी आवश्यक मार्गदर्शन केले. यावेळी दहावी व बारावी परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना भेटवस्तू देण्यात आल्या. तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि महिला खेळाडूंचाही रोख बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमांचे संचालन सौ. वैशाली राजूत यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समाजाचे संयोजक महादेव वैद्य, मोहन डांभारे, राजेश पिंपळे, राजेंद्र महाजन, राजीव धानोरकर, गिरीश कावळे, रवी वैद्य, ज्ञानेश्वर शेंडे, नेमदास मस्के, प्रशांत नंदुरकर, दशरथ उताणे, विजय चापले, फत्तुजी सातपुते, सुरेश खेवले, टेमराज माले, पंढरी धोटे, स्वप्निल रोहनकर, प्रदीप महाजन, धनरे, अशोक नंदुरकर, डॉ.चंदनखेडे, कमलाकर भांडे, चिंचाळकर, कुणाल टोंगे, चेतन धानोरकर, आरव धानोरकर, ॲड.मयुरी वैद्य व अनुराधा महाजन यांनी विशेष परिश्रम घेतले समाजातील विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करत त्यांना प्रोत्साहन देणारा हा उपक्रम उपस्थितांकडून कौतुकास पात्र ठरला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.