spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी निवड झालेल्या खांदिनी मोरेचा इंजि. प्रदीप पडोळे यांच्या हस्ते सत्कार

हंसराज,भंडारा सिंदपुरी :- तुमसर-मोहाडी विधानसभा प्रमुख इंजिनिअर प्रदीप पडोळे यांनी सिंदपुरी येथील गुणवंत विद्यार्थिनी खांदिनी पपीकांत मोरे हिच्या निवासस्थानी भेट देऊन तिचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

खांदिनी ही आर.एस.एस.जी.के. अग्रवाल कॉलेज, तुमसर येथील १२ वी सायन्सची विद्यार्थिनी आहे. सन २०२४-२५ च्या विज्ञान प्रदर्शनीत तिने मिळवलेल्या यशामुळे, तिची इस्रो (ISRO) येथील चार दिवसीय अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली होती. पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हाधिकारी सावंत कुमार यांच्या सहकार्याने ‘डाएट’ भंडारातर्फे हा प्रोत्साहनपर दौरा आयोजित करण्यात आला होता.

खांदिनीने हा अभ्यास दौरा यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल १५ ऑगस्ट रोजी इंजि. प्रदीप पडोळे यांनी तिचे विशेष कौतुक केले. याप्रसंगी गजानन निनावे, सतीश सोनवाणे, बाला तुरकर, पपीकांत मोरे, , तिचे आजोबा व कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

Popular Articles