spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

खापा नगर परिषद सदस्य पदांची आरक्षण सोडत आज

खापा :- खापा नगर परिषद येथील सदस्य पदांची आरक्षण सोडत बुधवार, दि. ८ ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे. नगर परिषद सभागृहात सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम पार पडणार असून, पिठासीन अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी (राजशिष्टाचार) इंदिरा चौधरी उपस्थित राहणार आहेत. तसेच नगर परिषदचे मुख्याधिकारी सुमेध अलोणे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सोडत काढण्यात येणार आहे.

या आरक्षण सोडतीसाठी सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक उपस्थित राहणार असून, नगर परिषद क्षेत्रातील आगामी निवडणुकांसाठी ही सोडत महत्त्वाची ठरणार आहे.

Popular Articles