spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

स्व.निर्धन पाटील वाघाये महाविद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न

– “आजची स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून देशाच्या प्रगतीत सहभागी” – प्रा. स्मिता तीतीरमारे यांचे प्रतिपादन

हंसराज,प्रतिनिधी भंडारा लाखनी :- स्थानिक स्व. निर्धन पाटील वाघाये महाविद्यालय, लाखनी येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कापसे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या कार्यक्रमात महिलांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक प्रगतीचा आढावा घेण्यात आला.

याप्रसंगी प्रमुख वक्त्या म्हणून प्रा. स्मिता तीतीरमारे उपस्थित होत्या. आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात त्यांनी स्त्रियांच्या बदलत्या परिस्थितीवर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या की, “प्राचीन काळी स्त्रियांना स्वातंत्र्य नाकारले गेले होते, मात्र काळाच्या ओघात शिक्षणाचा प्रसार झाला आणि आधुनिक क्रांती घडली. आज स्त्रिया जागृत झाल्या असून त्या संशोधक, वैज्ञानिक, पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांसारख्या सर्वोच्च पदांवर विराजमान आहेत. आजची स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून देशाच्या आणि समाजाच्या प्रगतीत मोलाचा हातभार लावत आहे.”

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रा. मनीषा सपाटे, प्रा. राहांगडाले आणि प्रा. कागदे उपस्थित होत्या. यावेळी प्रा. मनीषा सपाटे यांनी राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, फातिमा शेख आणि इंदिरा गांधी यांसारख्या महान स्त्रियांची उदाहरणे देऊन महिलांच्या उत्थानाचा प्रवास उलगडून दाखवला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना (NSS) प्रमुख डॉ. पुण्यशिल टेंभूरणे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. शेवटी उपस्थित सर्वांचे आभार प्रा. राहांगडाले यांनी मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थिनी आणि महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.