spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

वाहिटोला गावात बिबट्याचा मुक्त संचार ; नागरिकात भीती

– मॉइलच्या जुन्या डंम परिसरात बिबट्याच्या मुक्त संचार

सचिन चौरसिया,रामटेक :- तालुक्यातील वाहीटोला गावात मंगळवार (दि.३०) जून रोजी रात्री बिबट्याचे दर्शन झाले. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शेतशिवारात गावालगतच्या परिसरात बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्याने ग्रामस्थ दास्तावले आहेत. वाहीटोला परिसरात बिबट्याचा वावर असल्याचा अनेक खुणा सापडल्या आहेत. अनेक ठिकाणी या बिबट्यांच्या हल्ल्यात शेळ्या, कुत्रे, कोंबड्या भक्ष बनले आहेत. दुचाकीवरून नाईट ड्युटी करून घरी परत जातांना नर्स महिलांला गज्जूजी यादव यांच्या घरासमोरील मॉइलच्या संरक्षण भिंती जवळ बिबट्या बसल्याचा दिसला असता तो गावचे ग्रामस्थ यादव यांच्या घराजवळील गोठ्यातील जनावरांवर नजर ठेवून असल्याचं आढळला. महिलांनी यादव यांना फोन करून बिबट्या असल्याची माहिती दिली. त्यांनी मोबाईलमध्ये त्याचे चित्रीकरण केले. आरडाओरड्यामुळे बिबट्याने तेथून धूम ठोकली. तसेच (दि.१) जुलै रोजी मॉइलच्या जुन्या डंम परिसरात बिबट्याच्या मुक्त संचार मोबाईलमध्ये कैद झाले आहे. चित्रीकरण केलेला व्हिडिओ समाजमाध्यमांवर व प्रसारमाध्यमांत पसरल्याने वनविभागाची झोप उडाली. आहे. बिबट्या दिसल्याची बातमी आणि व्हिडिओ व्हायरल होताच वनविभाग तात्काळ सक्रिय झाला.

Popular Articles