spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

वाशिम जिल्ह्यातील उबाठा गटातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

– भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले स्वागत

वाशिम जिल्ह्यातील कारंजा, मंगरूळपीर, मनोरा भागातील विविध संस्था, समित्यांच्या पदाधिकाऱ्यांसह वेगवेगळ्या पक्षांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी सोमवारी भाजपात प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी आ. शाम खोडे, आ. सई डहाके, भाजपा जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम चितलांगे, भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन, भाजपा प्रदेश कार्यालय प्रभारी रविंद्र अनासपुरे उपस्थित होते.

यावेळी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ‘सब का साथ सब का’ या न्यायाने शेतकरी, कष्टकरी अशा तळागाळातील प्रत्येकाच्या जीवनात कसा आनंद निर्माण होईल याचा विचार होत आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि वीजबिल थकबाकी माफ केली. राज्यातील सर्व शेतजमीन ओलिताखाली आली पाहिजे याचा विचार हे सरकार करते. तर सहकार क्षेत्रातील अडचणी दूर करण्यासाठी केंद्रीय मंत्री अमित शाह यांचे पाठबळ आहे. त्यामुळे सामाजिक जाण आणि अनुभव असणारा प्रत्येक कार्यकर्ता भाजपात दाखल होत आहे आणि त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

आ. शाम खोडे म्हणाले, राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वावर ठाम विश्वास असल्याने हे पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजपात दाखल होत आहेत. सर्वाना एकत्र घेऊन पुढील वाटचाल होणार आहे.

यावेळी कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती महादेवराव काकडे, उपसभापती गोवर्धन चव्हाण, शिवसेना माजी जिल्हाप्रमुख विजय खानजोळे, मा. सभापती पंचायत समिती तथा संचालक कृषि उत्पन्न बाजार समिती भास्कर शेगीकर, जिल्हा परिषद माजी सदस्य भाऊराव नाईक, राष्ट्रवादी काँग्रेसचे पांडुरंग कोठाळे, सचिन डाफेकर, विश्वास गोदमले, एन.डी. राठोड, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक आणि राज्य मार्केटिंग फेडरेशनचे संचालक सुरेश गावंडे, जिल्हा परिषद माजी सदस्य उमेश पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि राष्ट्रवादी आणि उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.