spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

गरजूंच्या ‘हक्काच्या घरासाठी’ नगराध्यक्ष अजय अग्रवाल यांचा पुढाकार

– रमाई आवास योजनेतून घरकुलाचे स्वप्न साकार

– नगर परिषद कामठीच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना आवास निधीचे धनादेश वितरित

कामठी :- आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू कुटुंबांना हक्काचे, सुरक्षित व पक्के घर मिळावे, यासाठी नगर परिषद कामठीचे अध्यक्ष अजय रुपनारायण अग्रवाल यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली रमाई आवास योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना आवास निधीचे धनादेश वितरित करण्यात आले. या मदतीमुळे अनेक कुटुंबांच्या पक्क्या घराचे स्वप्न साकार होण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

पात्र लाभार्थ्यांना आवास निधीचे धनादेश प्रदान करताना नगराध्यक्ष अजय अग्रवाल यांनी सांगितले की, “गरजू कुटुंबाला स्वतःचे पक्के आणि सुरक्षित घर मिळणे ही केवळ शासकीय मदत नसून, त्यांच्या सन्मानाने जगण्याची गरज आहे. नगर परिषद क्षेत्रातील एकही पात्र लाभार्थी आवास योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील आहोत.”

रमाई आवास योजनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना घरकुल उभारणीसाठी शासनाकडून आर्थिक सहाय्य दिले जाते. पात्र लाभार्थ्यांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचविण्यासाठी नगर परिषद प्रशासनाच्या माध्यमातून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यावर भर देण्यात येत आहे.

“गरजूंच्या डोक्यावर हक्काचे छप्पर उभे करणे हेच आमचे ध्येय”, या भावनेतून नगराध्यक्ष अजय अग्रवाल यांच्या पुढाकाराने राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमामुळे लाभार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आवास निधीचा धनादेश हा केवळ आर्थिक मदतीचा कागद नसून, अनेक कुटुंबांसाठी नव्या आशेची, सुरक्षित भविष्याची आणि सन्मानाने जगण्याची सुरुवात ठरत आहे.

Popular Articles