Home Latest News आईने ‘यकृत’ देऊन वाचविले मुलीचे प्राण, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ‘आर्थिक आधार’

आईने ‘यकृत’ देऊन वाचविले मुलीचे प्राण, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ‘आर्थिक आधार’

0

<p><strong>मुंबई &colon;-<&sol;strong> सात वर्षांची देवांशी गेल्या अनेक महिन्यांपासून यकृताच्या गंभीर आजाराशी झुंज देत होती&period; डॉक्टरांनी अखेर &OpenCurlyQuote;यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया’ हा एकमेव पर्याय असल्याचे सांगितले&period; तसेच उपचारासाठी 20 लाख रूपये खर्च येणार असल्याचे सांगितले&period; मात्र&comma; भाजीपाला विक्रीचा छोटा व्यवसाय करणाऱ्या कुटुंबापुढे या उपचाराचा खर्च परवडणारा नव्हता&period; या कठीण काळात &OpenCurlyQuote;मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्ष’चा कुटूंबीयांना आर्थिक आधार मिळाला&period; तसेच देवांशीच्या आईने तिला यकृत दिल्यानंतर भाग देवून तिच्यावर यशस्वी उपचार करण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p>वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील वरूड &lpar;बु&rpar; येथे राहणारे रवींद्र गावंडे हे भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात&period; मागील अनेक दिवसांपासून त्यांची मुलगी देवांशी पोटदुखी&comma; ताप&comma; मळमळ होणे आदींमुळे सतत आजारी पडत होती&period; पालकांनी सुरूवातीला मंगरूळपीर आणि अकोला येथे तिच्यावर उपचार केले&period; परंतु तिच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने अखेर तिला नागपूर येथे हलविण्यात आले&period; वैद्यकीय तपासणीनंतर&comma; तज्ज्ञ डॉक्टरांनी तिचे यकृत गंभीर स्वरूपात बाधित झाल्याचे निदान केले&period; तसेच यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया’ गरजेचे असल्याचे सांगितले&period; शस्त्रक्रियेसाठी 20 लाख रुपये खर्चाचा अंदाज त्यांनी वर्तविला होता&period;<&sol;p>&NewLine;<p>दरम्यान&comma; देवांशीच्या वडिलांना मित्रांकडून मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीबाबत माहिती मिळाली&period; त्यांनी कक्षाकडे धाव घेतली&period; त्यासोबतच समाज माध्यमावर मदतीकरिता आवाहन केले&period; कक्षाच्या पुढाकाराने देवांशीवर पुढील उपचार मुंबईतील वाडिया हॉस्पिटलमध्ये सुरू झाले&period; या उपचारासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष&comma; टाटा ट्रस्टच्या माध्यमातून उपचाराची मोठी रक्कम उभी राहिली&period; उर्वरित रक्कम इतर काही सामाजिक संस्था आणि गावकऱ्यांच्या वर्गणीतून गोळा करण्यात आली&period; देवांशीची आई मीनाक्षी गावंडे यांनी यकृत दिले&period; तिच्यावर 7 जुलै 2025 रोजी यकृत प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली&period;<&sol;p>&NewLine;<p>देवांशीची प्रकृती आता स्थिर असून तिच्या प्रकृतीत दिवसेंदिवस सुधारणा होत आहे&period; आता तिला डिस्चार्ज मिळाला आहे&period; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष आणि टाटा ट्रस्टच्या मदतीमुळेच आमच्या मुलीचे प्राण वाचले&comma; असे देवांशीचे वडील रवींद्र गावंडे यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p>मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार प्रत्येक गरजू&comma; गरीब रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत यासाठी कक्षाच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करत आहोत&period; देवांशी त्याचे एक उदाहरण आहे&period; आम्ही वेळेवर मदत करू शकलो याचा आम्हाला आनंद आणि समाधान आहे&comma; असे मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version