कुही :- येथील भारतमाता चौकातील बाल गणेश शारदा उत्सव मंडळाच्या वतीने राष्ट्रीय दुय्यम खडा तमाशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमात शाहीरा सुरमा बारसागडे विरुद्ध सूरज नवघरे यांचा खडा तमाशाचा रंगतदार सामना रंगला. या कार्यक्रमात कलाकारांनी सादर केलेल्या बहारदार कलाविष्काराला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत लोककलेचा आनंद घेतला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार राजू पारवे, लोकनेते प्रमोद घरडे आणि श्रद्धा मल्टिस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या सोनाली प्रदीप हिवरकर उपस्थित होत्या. तर प्रमुख उपस्थिती म्हणून विक्की भालोटिया,प्रमिला महादेव जिभकाटे, दुर्गेश हजारे, नागोजी लांजेवार आणि रामकृष्ण डहाके यांची उपस्थिती होती.
यावेळी मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत समृद्ध लोककलेची परंपरा जपणाऱ्या कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. तसेच अशा सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून पारंपरिक लोककला पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य कौतुकास्पद असल्याचे मत व्यक्त करून मंडळाला पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाश लेंडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन मंडळाचे अध्यक्ष सदानंद लेंडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी निखिल लामसे, एकनाथ डहाके, देवेंद्र लेंडे, राहुल झोडे, रामेश्वर शेंद्रे, रितिक तलमले, मयूर तलमले,मुकेश लेंडे,प्रियांशु डहाके आणि नयन लेंडे यांनी विशेष परिश्रम घेतले.






