Home Latest News सामाजिक न्याय भवन येथे भटके विमुक्त दिन साजरा

सामाजिक न्याय भवन येथे भटके विमुक्त दिन साजरा

0

<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"><strong>यवतमाळ&comma; दि&period; ११  &colon;<&sol;strong> भटके विमुक्त समाजाचे स्वातंत्र्यातील व राष्ट्र उभारणातील योगदान लक्षात घेऊन त्यांच्या सन्मानार्थ ३१ ऑगस्ट हा दिवस भटके विमुक्त दिवस साजरा करण्यात येत आहे&period; या समाजाच्या संस्कृतीचे जीवनमूल्य&comma; परंपरा दर्शविणारे विविध सांस्कृतिक&comma; शैक्षणिक व माहितीपर उपक्रम राबवून हा दिवस डॉ&period; बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे साजरा करण्यात आला&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">कार्यक्रमाला बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक ओमप्रकाश नगराळे&comma; समाजकल्याणच्या सहाय्यक आयुक्त मंगला मून उपस्थित होते&period; यावेळी ओमप्रकाश नगराळे यांनी शासनाच्या भटके-विमुक्त समाजासाठी असणाऱ्या योजनांची माहिती दिली&period; भारत जाधव यांनी भटके विमुक्त समाज परंपरा आणि स्थिती या विषयावर मार्गदर्शन करतांना या समाजाचा शौर्यपूर्ण इतिहास&comma; कलात्मक परंपरा आणि सद्याच्या समस्यांची मांडणी केली&period; सहाय्यक आयुक्त मंगला मून यांनी विद्यार्थ्यांना जात वैद्यता पडताळणी प्रमाणपत्राबाबत मार्गदर्शन केले&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">भटके विमुक्त दिवसानिमित्त जिल्ह्यातील शाळा&comma; वसतिगृहे&comma; आश्रमशाळा येथे भटके विमुक्त समाजाचा इतिहास&comma; समाजाची परंपरा व सद्यस्थिती या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली&period; या स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रफुल गणपत भोयर&comma; द्वितीय केसरी शरद गाडवे व तृतीय क्रमांक मयुरी देवेंद्र राठोड यांना मिळाला&period; तसेच सेटलमेंट व १९५२ गुन्हेगार कायदा या विषयावरील वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक कल्याणी बावणे व द्वित्तीय क्रमांक दिव्या जुनघरे यांनी मिळविला&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जिवनावर आधारीत निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक जानवी दादाराव मोहोरे&comma; द्वितीय स्वाती संजय राठोड&comma; तृतीय नव्या नारायण गोरे यांनी मिळविला&period; तसेच हरीष विश्वजित जाधव&comma; सार्थक ज्ञानेश्वर कुडवे&comma; प्रणाली नामदेव राठोड या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">भारतीय अंतराळ संशोधन संस्था येथे भेट देण्याकरीता स्पर्धा परिक्षा घेण्यात आली होती&period; त्यामध्ये कल्याणी सखाराम राठोड&comma; ईश्वारी कैलास जाधव&comma; गौरी पंकज काटकर व मयुरी देवेंद्र राठोड&comma; सचिन किसन राठोड&comma; हिमांशु किशोर आडे&comma; जय नागोराव दिवसे व योगेश शंकर राठोड या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळविले&period; चित्रे&comma; भिंतीचित्र पोस्टर प्रदर्शनमध्ये विद्यार्थ्यांनी बनवलेली कॅनव्हस पेंटींग प्रदर्शनाकरीता ठेवण्यात आले होते&period; तसेच विद्यार्थ्यांनी पारंपारीक वेशभूषा परिधान करून भटक्या विमुक्त समाजाच्या संस्कृतीचे जीवनमुल्य&comma; परंपरा दर्शविणारे विविध सांस्कृतिक नृत्य सादर करण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">भटके विमुक्त दिवसानिमित्त आयोजित शिबिरामध्ये ३५२ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी&comma; २२ विद्यार्थ्यांचे आधार कार्ड नोंदणी&comma; ७५ विद्यार्थ्यांचे आयुष्यमान भारत कार्ड काढण्यात आले&period; तहसिल कार्यालयामार्फत जातीचे दाखले काढण्याचे शिबिर घेण्यात आले&period; तसेच जात वैद्यता पडताळणी प्रमाणपत्र व महामंडळांच्यावतीने आर्थिक सहाय्य मिळण्याकरीता मार्गदर्शन करण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">कार्यक्रमाचे संचलन ज्योत्सना संदीप पवार यांनी केले&period; आभार गजेंद्र राऊत यांनी मानले&period; कार्यक्रमासाठी निरीक्षक गजेंद्र राऊन&comma; अभिजित घोडे&comma; योगेश बडवाईक&comma; स्मिता झलके&comma; तुषार कोलकर&comma; सतिश वानखेडे&comma; सचिन ढगे&comma; सुनंदा राठोड&comma; प्रिती कांबळे व सर्व कर्मचारी वृंदांनी सहकार्य केले<&sol;p>&NewLine;

Exit mobile version